सार

चीननंतर आता आपल्या देशातही इन्फ्लूएंझा व श्वसनाशी संबंधित आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Pneumonia Outbreak In China : चीनमध्ये वाढणारा इन्फ्लूएंझा आजाराचा प्रादुर्भाव आता जगभरातही वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारनेही यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. या विषाणूचा विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसत आहे. अशा परिस्थितीत नेमके काय करावे आणि काय करू नये? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

इन्फ्लूएंझा : संसर्गजन्य विषाणू

सीझनल फ्लू आणि इन्फ्लूएंझा हे सामान्य आजारांपेक्षा थोडेसे वेगळे व्हायरस आहेत. या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. शिंकणे, खोकणे व हाताने स्पर्श केल्यानंही हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. या रोगाचा विषाणू जवळपास पाच ते सात दिवस सक्रिय राहतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार नवजात बालके, वयोवृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुलांना या आजाराची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.

सीझनल फ्लू किंवा इन्फ्लूएंझाची लक्षणे

  • ताप येणे
  • थंडी लागणे
  • भूक कमी होणे
  • शिंका येणे
  • कोरडा खोकला येणे

NOTE - रुग्णांमध्ये तीन आठवड्यांहून अधिक दिवस ही लक्षणे कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  • शिंकताना किंवा खोकताना तोंड व नाक रूमालाने झाकावे
  • साबण-पाण्याने हात वारंवार स्वच्छ करा
  • डोळे, नाक व तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व मास्कचा वापर करावा
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा
  • नियमित व्यायाम करा व पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी
  • जास्त प्रमाणात पाणी प्यावे व पौष्टिक आहाराचे सेवन करा
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
  • सीझनल फ्लू व इन्फ्लूएंझाग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा

इन्फ्लूएंझाची लागण झाल्यास काय करावे?

  • इन्फ्लूएंझाची लागण झाल्यास सर्वप्रथम घराजवळील सरकारी आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करावी.
  • घरातच राहावे, सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे. लहान मुलांनाही शाळेत पाठवू नये.
  • इन्फ्लूएंझाग्रस्त रुग्णांनी कमीत कमी सात दिवस क्वॉरेंटाइन व्हावे.
  • इन्फ्लूएंझाच्या लक्षणांचे तीन आठवडे निरीक्षण करावे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावे

आणखी वाचा

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये फैलावतोय नवा गंभीर VIRUS, भारतावर होणार परिणाम?

Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवस 41 कामगार फिट राहण्यामागील सीक्रेट