Marathi

CLOTHES CLEANING TIPS

DRY CLEANचा खर्च टाळायचाय? घरच्या घरी असा स्वच्छ धुवा तुमचा ओव्हरकोट

Marathi

ओव्हरकोट धुण्याची पद्धत

आपल्याला घरातच ओव्हरकोट स्वच्छ धुवायचा असेल तर तो थंड पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. सौम्य डिटर्जंट पावडर किंवा शॅम्पूचा वापर करून हलक्या हाताने कोट धुवावा.

Image credits: freepik
Marathi

एअर ड्राय

घाम किंवा पाण्यामुळे कोट ओला झाला असेल तर हँगरमध्ये अडकवून हवेत ठेवावा. यामुळे कोटाला येणारा वास व जमा झालेल्या घाणीची समस्या दूर होईल.

Image credits: freepik
Marathi

सूट ब्रशचा करा वापर

हिवाळ्यात वापरले जाणारे कोट किंवा स्वेटशर्ट स्वच्छ करण्यासाठी सूट ब्रशचा वापर करू शकता. यामुळे स्वेटशर्टला चिकटलेले केस व दुर्गंध स्वच्छ करण्यास मदत मिळले.

Image credits: freepik
Marathi

डागांची स्वच्छता

स्वेटशर्टवर ज्या ठिकाणी डाग पडला आहे, तेवढाच भाग ओल्या कापडाच्या मदतीने स्वच्छ करावा. यासाठी आपण व्हिनेगर किंवा सोड्याचा वापर करू शकता.

Image credits: reddit
Marathi

फॅब्रिक रिफ्रेशनर

ओव्हरकोट स्वच्छ करण्यासाठी आपण फॅब्रिक रिफ्रेशनरचाही वापर करू शकता. यामुळे कपड्यांना घाणेरडा वास येत नाही.

Image credits: freepik
Marathi

स्वच्छ टॉवेलचा करा वापर

स्वेटशर्ट किंवा ओव्हरकोट धुण्यासाठी एका स्वच्छ टॉवेलचा वापर करावा. टॉवेल ओला करून त्यामध्ये कोट गुंडाळावा. यामुळे कोटवर जमा झालेली घाण स्वच्छ होते.

Image credits: freepik
Marathi

पॅच टेस्ट

ओव्हर कोट किंवा ब्लेझर स्वच्छ करण्यापूर्वी त्याच्या एखाद्या कोपऱ्यावर पॅच टेस्ट करून पाहा. कपड्याचा रंगावर दुष्परिणाम होत असल्यास कोणतेही प्रयोग न करता ड्रायक्लीनच करावे.

Image credits: freepik
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: freepik