शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर करतील हे पदार्थ
व्हिटॅमिन बी-5 शरीरातील अन्य व्हिटॅमिनप्रमाणे अत्यंत उपयोगी असते. यामुळे शरीरातील हार्मोन्सचा समतोल सुधारला जातो आणि तणावापासून दूर राहता.
शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी पुढील काही पदार्थ खाऊ शकता.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, फायबरचे गुणधर्म असतात. सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातीलव्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर होऊ शकते.
पोटॅशियम, मॅग्नेशियम व व्हिटॅमिन ई हे गुणधर्म ॲव्होकाडोमध्ये असतात. ज्यामुळे शरीराला पोषण तत्त्व मिळतात आणि आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
केळ खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता भरून निघते. केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळ्यात अॅन्टी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असल्याने शरीराला सूज येण्याची समस्या दूर होते.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन-ए, सी, के, प्रोटीन, फॉलेट, पोटॅशियम फायबर गुणधर्म असतात. दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर होईल.
रासबेरी हे फळं प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियमसह व्हिटॅमिन बी-5 चा उत्तम स्रोत आहे. रासबेरीचे दररोज सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता पूर्ण होईल.
शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये खनिज, फायबर, लोह गुणधर्म असल्याने शरीरातील हाडे बळकट होतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा