, नीर (किसलेले) – 1 कपबॉईल बटाटे – 2 मध्यम आकाराचे, चीज (किसलेले किंवा क्यूब्समध्ये) – ½ कप, ब्रेड क्रंब्स – ½ कप (तयार किंवा घरी केलेले), हळद – ¼ टीस्पून, लाल तिखट – 1 टीस्पून
एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेले बटाटे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, आमचूर/लिंबाचा रस, कोथिंबीर, ब्रेड क्रंब्स आणि कॉर्नफ्लोअर घालून चांगले मिक्स करा.
चीजचे छोटे क्यूब्स किंवा किसलेले चीज बाजूला ठेवा.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्यात मधोमध चीजचा तुकडा ठेवून टिक्कीप्रमाणे चपटी करा. सर्व टिक्क्या अशाच प्रकारे तयार करा.
नॉनस्टिक तवा गरम करा, थोडं तेल टाकून टिक्क्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळा. हवे असल्यास डीप फ्राय पण करू शकता.
मिक्समध्ये ओलसरपणा जास्त वाटल्यास थोडे अधिक ब्रेड क्रंब्स घालू शकता. हवे असल्यास चीजमध्ये थोडासा चिली फ्लेक्स किंवा ऑरिगानो मिसळून ‘cheesy surprise’ देता येतो.