काळ्या रंगातील कपडे परिधान करणे बहुतांशजणांना आवडते. पण या रंगातील कपडे धुताना कालांतराने त्याचा रंग फिकट होऊ लागतो.
काळ्या रंगातील कपडे धुण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल पुढे जाणून घेऊ.
काळे कपडे धुण्यापूर्वी सर्वप्रथम लेबलवर देण्यात आलेली माहिती वाचून घ्या. यानंतरच कपडे धुवा.
काळ्या रंगातील कपडे धुण्यासाठी नेहमीच उत्तम डिटेर्जेंटचा वापर करावा. याशिवाय काळे कपडे अन्य रंगातील कपड्यांसोबत धुवू नका.
काळ्या रंगातील कपडे थंड पाण्यात धुतल्याने त्याची चमक टिकून राहते.
काळ्या रंगातील कपडे धुताना पाण्यामध्ये मीठ मिक्स करा. यामुळे कपड्यांचा रंग दीर्घकाळ टिकतो.