India-Maldives Row : भारताशी पंगा घेतल्यानंतर मालदीवमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची खुर्ची धोक्यात

| Published : Jan 09 2024, 12:55 PM IST / Updated: Jan 09 2024, 12:58 PM IST

mohamed muizzu

सार

मालदीवच्या संसदेचे अल्पसंख्यांक नेते अली अजीम यांचा पक्ष राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. खरंतर भारताशी पंगा घेतल्यानंतर आता मालदीवमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

India-Maldives Row : भारताशी पंगा घेतल्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. मुइज्जू यांना पदावरुन हटवण्याची चर्चा केली जात आहे. मालदीवमधील संसदेचे अल्पसंख्यांक नेते अली अजीम (Ali Azim) यांनी मोइज्जू यांना पदावरुन हटवण्यासाठी आव्हान दिले आहे.

अली अजीम यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अजीम यांनी म्हटले की, "मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता कायम ठेवण्यासाठी आमची मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (Maldivian Democratic Party) पक्ष कटिब्ध आहे. याशिवाय राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना पदावरुन हटवण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली पाहिजेत का? असा सवाल देखील अजीम यांनी पक्षातील नेत्यांना केला आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केल्या होत्या अक्षेपार्ह कमेंट्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यानंतर मालदीवसोबत वाद निर्माण झाले. मालदीवमधील मंत्र्यांनी सोशल मीडियात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांच्या विरोधात अक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. यामुळे वाद निर्माण झाला होता. 

मालदीवच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमेंट्स करणाऱ्या तीन मंत्र्यांचे निलंबन केले. खरंतर मंत्र्यांनी कमेंट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'जोकर' आणि 'इज्राइलची कठपुतली' अशी कमेंट केल्यानंतर ती डिलीट केली होती.

मालदीवच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती व कला विभागाच्या उपमंत्री मालसा शरीफ (Malsha Shareef), मरयम शिउना (Mariyam Shiuna) आणि महजूम माजिद (Mahzoom Majid) यांचे निलंबन केले. सोमवारी (8 जानेवारी) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम शाहिब यांना दिल्लीत बोलावले होते.

बॉयकॉट मालदीवच्या हॅशटॅगचा सोशल मीडियात वापर
मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्सनंतर भारतीयांकडून सोशल मीडियात बॉयकॉट मालदीवचा (Boycott Maldives) हॅशटॅग वापरत संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर ते अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान यांनी मालदीव ऐवजी देशाअंतर्गत पर्यटकस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले. 

याशिवाय सोशल मीडियावर भारतीयांनी आपली मालदीवची टूर रद्द केल्याच्या पोस्टही शेअर केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला मालदीवच्या सरकारने मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्सवर म्हटले होते, "तिन्ही मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्स वैयक्तिक होत्या. सरकार त्यांच्या विचारांना पाठिंबा देत नाही."

आणखी वाचा : 

India-Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या 3 मंत्र्यांचे निलंबन, वाचा सविस्तर आतापर्यंत काय-काय घडले

Boycott Maldives : मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर पर्यटकांनी रद्द केल्या टूर, नक्की काय आहे प्रकरण?

अलास्का एअरलाइन्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानाच्या खिडकीची काच हवेतच निघाल्याचा पाहा धक्कादायक VIDEO