Boycott Maldives : मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर पर्यटकांनी रद्द केल्या टूर, नक्की काय आहे प्रकरण?

| Published : Jan 08 2024, 10:13 AM IST / Updated: Jan 08 2024, 10:29 AM IST

maldives

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांच्या विरोधात मालदीवमधील मंत्र्यांनी एक विधान केले होते. यामुळे आता मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकांनी आपली मालदीव येथील टूर रद्द केली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....

Boycott Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांच्या विरोधात मालदीवमधील मंत्र्यांनी एक विधान केले होते. या विधानामुळे आता बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने भारतीय नागरिकांना पर्यटनाबद्दल अपील करत एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. 

या पोस्टमध्ये कलाकार आणि क्रिकेटपटूने भारतीय नागरिकांना मालदीवऐवजी लक्षद्वीप (Lakshadweep) आणि सिंधुदूर्गसारख्या (Sindhudurg) पर्यटन ठिकाणी फिरण्यासाठी जावे असे म्हटले आहे. यामुळे मोठ्या संख्येने भारतीय प्रवाशांनी आपली मालदीवची ट्रिप रद्द केली आहे. याशिवाय देशातील मोठी ट्रॅव्हल कंपनीने देखील मालदीवमधील सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकताच लक्षद्वीप येथे दौरा केला होता. या दौऱ्यावेळी पंतप्रधान लक्षद्वीपच्या समुद्रकिनारी गेल्याचेही काही फोटो समोर आले आहेत. पंतप्रधानांच्या या फोटोंवर मालदीवमधील युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन (Mariyam Shiuna) यांनी पंतप्रधानांच्या फोटोंवर कमेट्स केली.

मंत्र्यांनी कमेट्स करत पंतप्रधानांना ‘जोकर’ आणि ‘इस्राइलची कठपुतली’ असे म्हटले होते. खरंतर अशा प्रकारची कमेट्स केल्यानंतर ती डिलीट करण्यात आली असली तरीही याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यामुळेच सोशल मीडियात बॉयकॉट मालदीवचा हॅशटॅग वापरुन युजर्सकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

EaseMyTripने रद्द केल्या फ्लाइट्स

भारतातील मोठी ट्रॅव्हल कंपनी इजमायट्रिप यांनी मालदीवमधील आपल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग रद्द केल्या आहेत. खरंतर मालदीव बेटावरील पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लागतो. भारतातील लाखो नागरिक प्रत्येक वर्षी मालदीवला आवर्जुन फिरायला जातात. पण मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात केलेल्या विधानामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

 

आणखी वाचा : 

ICU New Guidelines : अतिदक्षता विभागात रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी

अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला सामूहिक बलात्कार, हत्येचाही केला प्रयत्न

राम मंदिराला सोन्याचे दरवाजे? जाणून घ्या मंदिराबद्दलचे Unknown Facts