सार

भारत आणि मालदीवमधील तणाव वाढत चालला आहे. कारण मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमेंट्स केल्या होत्या. यावर आता मालदीवमधील सरकारने पाऊल उचलत पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या मंत्र्यांचे निलंबन केले आहे.

Maldives Government Suspends Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमेंट्स करणे मालदीवला भारी पडत असल्याचे दिसून येतेय. भारताने सोमवारी (8 जानेवारी, 2026) मालदीवचे राजदूत इब्राहिम शाहीब यांना बोलावून विरोध दर्शवला. याशिवाय देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातही मालदीवचा विरोध केला जात आहे. दुसऱ्या बाजूला मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमेंट्स करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांचे निलंबन केले आहे.

भारत-मालदीव तणावामध्ये आतापर्यंत घडल्या या गोष्टी

  • सोमवारी सकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम शाहिब यांना बोलावले. शाहिब दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात दाखल झाले.
  • मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमेंट्स करणारे तिन्ही मंत्री- मरयम शिउना (Mariyam Shiuna), मालसा शरीफ (Malsha Shareef) आणि महजूम माजिद (Mahzoom Majid) यांचे निलंबन केले आहे.
  • मालवदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्सवर नाराजी व्यक्त केली आहे.
  • मालदीवच्या सरकारने म्हटले आहे की, तिन्ही मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्स वैयक्तिक होत्या. सरकार त्यांच्या विचारांना पाठिंबा देत नाही.
  • भारतातील मोठी ट्रॅव्हल कंपनी EaseMyTripने मालदीवला जाणाऱ्या त्यांच्या सर्व फ्लाइट्सच्या बुकिंग रद्द केल्या आहेत.
  • मालदीवचे खासदार इवा अब्दुला यांनी म्हटले की, भारतीयांना संताप येणे योग्य आहे. मंत्र्यांनी केलेल्या कमेंट्सचा स्विकार केला जाऊ शकत नाही.
  • भारतातील नागरिकांनी देखील आपल्या मालदीवच्या टूर रद्द केल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियातही ते मालदीवच्या विरोधात आपले मत व्यक्त करत आहेत.
  • भारतात सोशल मीडियात #BoycottMaldives ट्रेण्ड होत आहे. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनी आपली सहल रद्द केल्याचेही सोशल मीडियामध्ये सांगत आहेत.
  • बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने लक्षद्वीपच्या येथे फिरायला जाण्याचे नागरिकांना अपील केले आहे.
  • सोशल मीडियावर #ChaloLakshadweepCampaign चालवले जात आहे. यामध्ये नागरिकांना आपली मालदीवची सहल रद्द करण्यास सांगितले जात आहे.

मालदीवचा विरोध का सुरू झालाय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावेळेचे काही फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंतप्रधानांनी लक्षद्वीपला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबद्दल म्हटले होते. यानंतर नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ काहीजण आले.

दुसऱ्या बाजूला संतप्त झालेल्या मालदीवच्या मंत्र्यांनी भारताविरोधात कमेंट्स करण्यास सुरुवात केली. यावेळी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही वाईट कमेंट्स केल्या. या कमेंट्समध्ये मंत्र्यांनी पंतप्रधानांना ‘जोकर’ आणि ‘इस्राइलची कठपुतली’ म्हटले होते. यामुळेच भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर मालदीवच्या मंत्र्यांच्या कमेट्सवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. याशिवाय मालदीवच्या टूरचही रद्द केल्या आहेत.

आणखी वाचा : 

PM Modi Lakshadweep Visit : जगभरात इंटरनेटवर लक्षद्वीपबद्दल करण्यात आले सर्वाधिक सर्च, मोडला 20 वर्षांचा रेकॉर्ड

Boycott Maldives : मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर पर्यटकांनी रद्द केल्या टूर, नक्की काय आहे प्रकरण?

Qatal Ki Raat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा इमरान खान यांच्यासोबत बातचीत करण्यास दिला नकार...वाचा 'कत्ल की रात'चा किस्सा