सार
Alaska Airlines Plane Emergency Landing : अलास्का एअरलाइन्सचे विमान कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाची काच हवेतच निघाल्याचे सांगण्यात येत आहे.
Alaska Airlines Plane Emergency Landing : अमेरिकेत शनिवारी (6 जानेवारी) एक मोठी दुर्घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलास्का एअरलाइन्सच्या विमानाच्या खिडकीची काच आणि एक भाग उड्डाणानंतर हवेतच उडाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर विमानाचे ओरेगॉन शहरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
एअरलाइनकडून दुर्घटनेसंदर्भात पोस्ट
अद्याप, या दुर्घटनेत कोणताही प्रवासी जखमी झालाय की नाही याची माहिती देण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा विमानात 174 प्रवाशांसह सहा चालक दल असल्याचे सांगण्यात येत आहे. एअरलाइनकडून या घटनेबद्दल अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
एअरलाइनने म्हटले की, पोर्टलँड (Portland), ओरेगॉन (Oregon) येथून ओंटारियो (Ontario), कॅलिफोर्नियासाठी (California) अलास्का एअरलाइन्सचे विमान 1282 ने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर ही दुर्घटना घडली आहे. विमानातील 174 प्रवासी आणि सहा चालक दलाच्या सदस्यांना पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँड करण्यात आले आहे.
अलास्का एअरलाइन्सच्या विमानाची खिडकी तुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटले की, विमानातील एका प्रवाशाने पाठवलेल्या फोटोंवरुन कळते विमानाचा एक मोठा हिस्सा हवेतच उडून गेला होता.
आणखी वाचा :
सोमालियामध्ये MV LILA NORFOLK जहाज हायजॅक, जहाजावर आहेत 15 भारतीय क्रू मेंबर्स