सार
अमेरिकेन तपास यंत्रणा आणि गुप्तहेर संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) मयुषी भगत या तरुणीचा शोध घेत आहे. या तरुणीची माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Indian Student Mayushi Bhagat Missing : अमेरिकेतील तपास यंत्रणा आणि गुप्तहेर संस्थेकडून (FBI) 29 वर्षीय भारतीय तरुणी मयुषी भगत (Mayushi Bhagat) हीचा शोध घेत आहे. मयुषी ही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेट लिस्टमध्ये (Most Wanted List) असून तिची माहिती देणाऱ्याला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. म्हणजेच भारतीय रूपयांत ही रक्कम 8 कोटी रूपयांहून अधिक असल्याचे समजते.
मयुषी ही गुन्हेगार नसून ती बेपत्ता झाली आहे. एफबीआयच्या बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या यादीत मयुषी हिचे नाव आहे. मयुषी भगत चार वर्षांपूर्वी न्यू जर्सी (New Jersey) येथून बेपत्ता झाली होती.
29 एप्रिल 2019 रोजी शेवटचे पाहिले गेले
मायुषी भगतला 29 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी शेवटचे पाहिले गेले होते. ती आपल्या अपार्टमेंटमधून रंगीत पँट आणि काळ्या रंगाची टी-शर्ट घालून बाहेर पडली होती. 1 मे 2019 रोजी मयुषी हीच्या घरातील मंडळींनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली होती.
चार वर्षांपासून मयुषीचा थांगपत्ता नाही
एफईबीआयच्या नेवार्क फिल्ड ऑफिस आणि जर्सी शहरातील पोलिसांच्या विभागाला चार वर्षांपासून मयुषीचा थांगपत्ता लागलेला नाही. यासाठी आता एफबीआय सामान्य नागरिकांकडून तिच्या शोधासाठी मदत घेत आहे. एफबीआयने म्हटले आहे की, मयुषीची माहिती देणाऱ्याला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल.
न्यू यॉर्क इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थीनी
गेल्या वर्षात (2023) मयुषी भगत हीचे नाव बेपत्ता नागरिकांच्या यादीत टाकण्यात आले होते. एफबीआयने भगतबद्दल नागरिकांनी माहिती द्यावी असे आवाहन केले होते. मयुषी भगतचा जन्म जुलै 1994 मध्ये झाला होता. ती अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर आली होती आणि न्यू यॉर्क इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती.
एफबीआयद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मयुषी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषा बोलते. न्यू जर्सी आणि प्लेनफिल्ड दक्षिणेत मयुषीचे मित्र राहतात. एफबीआयने हे देखील म्हटले की, मयुषीचे ठिकाण सांगणाऱ्या व्यक्तीने एफबीआयच्या नेवार्क आणि जर्सी शहरातील पोलिसांच्या विभागात फोन करण्याचे आवाहन दिले आहे.
भगत हीचे काळ्या रंगाचे केस आणि तपकिरी रंगाचे डोळे आहेत. तिची उंची 5.10 फूट असून ती 2016 मध्ये F1 स्टुडेंट व्हिसावर अमेरिकेत आली होती.
आणखी वाचा:
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम पूर्णपणे ठणठणीत, छोटा शकीलचा दावा
आफ्रिकन व्यक्ती हिंदू परंपरेनुसार करतोय नव्या गाडीची पूजा, Video सोशल मीडियावर व्हायरल
सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान