आफ्रिकन व्यक्ती हिंदू परंपरेनुसार करतोय नव्या गाडीची पूजा, Video सोशल मीडियावर व्हायरल

| Published : Dec 14 2023, 03:52 PM IST / Updated: Dec 14 2023, 05:37 PM IST

African performing Puja

सार

Viral Video: मूळचा आफ्रिकन असलेल्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये व्यक्ती नव्या गाडीची पूजा करताना दिसून येत आहे.

African Man performing rituals on buying Vehicle : भारतात हिंदू धर्मानुसार एखादी नवी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची पूजा केली जाते. परदेशातही अशा काही धार्मिक परंपरा पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार पूजा करतात. 

मूळचा आफ्रिकन असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये व्यक्ती नव्या गाडीची पूजा करताना दिसून येत आहे.

सोशल मीडियामध्ये व्हिडीओ व्हायरल
आफ्रिकन व्यक्ती हिंदू परंपरेनुसार (Hindu Rituals) मंत्र बोलून नव्या गाडीची पूजा करताना दिसून येत आहे. व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खरंतर नवे वाहन, एखादी महागडी वस्तू अथवा नवे घर खरेदी केल्यानंतर हिंदू धर्मात त्या गोष्टींची शुभ वस्तू म्हणून पूजा केली जाते. पण आफ्रिकन असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे पूजा करताना व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

व्हिडीओमध्ये व्यक्ती आलिशान कारची पूजा करताना दिसून येत आहे. त्याच्या हातात पूजेची थाळी आहे. या पूजेच्या ताटात काही पवित्र वस्तू देखील आहेत. व्यक्ती संस्कृत भाषेतील श्लोक 'ओम वासुदेवाय नमः...' म्हणत कारची पूजा करत आहे.

व्हिडीओ रामू जीएसवी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर शेअर केला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने व्ह्युज मिळाले आहेत.

आणखी वाचा: 

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

'आईला मी आवडत नाही, बाबाही ओरडतात' चिमुकल्याच्या वेदना ऐकल्यानंतर तुम्हीही रडाल VIRAL VIDEO

सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

Top Stories