सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

| Published : Dec 07 2023, 05:19 PM IST / Updated: Dec 07 2023, 05:56 PM IST

WHO
सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

World News: दारू आणि सॉफ्ट ड्रिंक यासारख्या गोष्टींवर अधिक टॅक्स लावला पाहिजे असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. कारण यासारख्या पेयांमुळे दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होतोय.  

WHO on Liquor and Soft Drinks : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात दारू आणि सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनामुळे एक कोटी लोकांचा मृत्यू होतो, असे म्हटले आहे. मृतांची आकडेवारी कमी करण्यासाठी WHO जगभरातील देशांच्या सरकारांना आवाहन केले आहे की, दारू आणि सॉफ्ट ड्रिंक यासारख्या पेयांवर अधिक टॅक्स लावावा. तसेच खूप कमी देशांकडून आपल्या नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी टॅक्सचा वापर केला जात आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले।

डब्लूएचओने यासंदर्भात मंगळवारी (5 डिसेंबर 2023) एक विधान जारी केले आहे. या विधानात असे नमूद करण्यात आले आहे की, “आरोग्यास नुकसान पोहोचवणाऱ्या दारू आणि कोल्ड ड्रिंक यासारख्या प्रोडक्ट्सवर जगभरात सरासरी टॅक्स कमी आहे. टॅक्स वाढवल्यास लोकांचे आरोग्य सुधारू शकते. त्याचसोबत अशा उत्पादनांवर उत्पादन शुल्कही लागू केला पाहिजे”.

 

मद्यपानामुळे वर्षाला 26 लाख लोकांचा मृत्यू
जगभरात मद्यपानामुळे दरवर्षी तब्बल 26 लाख लोकांचा मृत्यू होतो. हानिकारक खाद्यपदार्थ आणि पेयांच्या सेवनामुळे 80 लाखांहून अधिक लोक दगावताहेत. दारू आणि सॉफ्ट ड्रिंक यासारख्या पेयांवर टॅक्स लावल्यास मृतांच्या आकडेवारीत घट होईल. यामुळे आरोग्यास हानिकारक असणाऱ्या अशा पेयांचा वापर कमी होईल.शिवाय कंपन्यांना आरोग्यासाठी फायदेशीर असणारे प्रोडक्ट तयार करण्यासाठी देखील प्रोत्साहन मिळेल,  असेही WHOने म्हटले आहे.

सोड्यावर 6.6 टक्के टॅक्स
108 देशात दारू आणि सॉफ्ट ड्रिंक्सवर काही टॅक्स लावला जातो. जागतिक स्तरावर उत्पादन शुल्क सोड्याच्या किंमतीच्या सरासरी 6.6 टक्के आहे. यापैकी बहुतांश देश हे पाण्यावर देखील टॅक्स लावतात.

कर धोरणासाठी नियमावली जारी
डब्लूएचओने मंगळवारी (5 डिसेंबर 2023) 194 सदस्यांच्या देशांसाठी मद्य कर धोरण आणि प्रशासन यासंबंधी एक नियमावली जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, "टॅक्स लावण्यासह कमीतकमी किंमत ठरवल्यास स्वस्त दरात मिळणाऱ्या दारूचा वापर कमी होऊ शकतो. यामुळे मद्यपानामुळे होणारे मृत्यू, अपघात आणि गुन्हे देखील कमी होतील. जी मंडळी कधीकाळी पण खूप दारू पितात,  ते स्वस्त किंमतीची दारू खरेदी करतात.

डब्लूएचओनुसार, 148 देशांमध्ये दारू या पेयावर राष्ट्रीय उत्पादन शुल्क लावला जातो. तसेच 22 देशांमध्ये दारूवर उत्पादन शुल्कासाठी सूट देण्यात आली आहे. बिअरमधील सर्वाधिक विक्री केल्या जाणाऱ्या ब्रँडच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क सरासरी 17.2 टक्के आहे, असेही डब्लूएचओने नमूद केले आहे.

आणखी वाचा: 

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी

China Pneumonia Outbreak : चीनमध्ये फैलावतोय नवा गंभीर VIRUS, भारतावर होणार परिणाम?

Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून