सार
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमचा जवळचा व खास माणूस छोटा शकीलने दाऊद इब्राहिम पूर्णपणे फिट असल्याचा दावा केला आहे. दाऊदचा मृत्यू झाल्याचे वृत्त अफवा असल्याचेही त्याने म्हटले.
Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याचेही (Dawood Ibrahim Death News) वृत्त समोर आले होते.
त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे म्हटले जात होते. विषप्रयोगामुळे दाऊदची अवस्था गंभीर झाल्याने त्याला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण विषप्रयोगामुळे तो दगावल्याची बातमी समोर आली होती.
छोटा शकीलचा दावा
यादरम्यान दाऊदच्या मृत्यूचे वृत्त त्याचा अतिशय जवळचा व्यक्ती छोटा शकीलने (Chhota Shakeel) फेटाळले आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, छोटा शकीलने दाऊद इब्राहिम एक हजार टक्के ठणठणीत असल्याचा दावा केला आहे. दाऊदबाबत वारंवार अफवा पसरवत असल्याचेही त्याने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्याही केवळ अफवा आहेत, असे शकीलने म्हटले आहे.
दाऊद इब्राहिमबाबत
दाऊद इब्राहिम अनेक दशकांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. पण ही बाब पाकिस्तानने नेहमीच नाकारली आहे. पाकिस्तानच्या अधिकृत भूमिकेनुसार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाहीच, मग त्याच्यावर कराचीत उपचार कसे होणार आणि पाकिस्तानात त्याच्यावर विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न कसा होऊ शकतो? पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांमध्ये दाऊद इब्राहिमबाबतचे वृत्त प्रसारित करण्यात आलेले नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर पाकिस्तानातील पत्रकार दाऊद इब्राहिमवर करण्यात आलेल्या विषप्रयोग व त्याच्या मृत्यूबाबत नक्कीच चर्चा करताहेत.
पाकिस्तानात इंटरनेट बंद?
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचे वृत्त समोर येताच रविवारी (17 डिसेंबर 203) रात्री पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
पण छोटा शकीलने म्हटले की, जेव्हा तो पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमला भेटायला गेला होता, तेव्हा त्याची प्रकृती चांगली होती.
आणखी वाचा :
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग, पाकिस्तानात इंटरनेट सेवा बंद?