अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती

| Published : Dec 18 2023, 10:32 AM IST / Updated: Dec 18 2023, 10:53 AM IST

Dawood Ibrahim

सार

Underworld Don Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अज्ञात लोकांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील कराचीमधील एका रुग्णालयात दाऊला भरती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Dawood Ibrahim poisoned in Pakistan? : जगातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, अज्ञात लोकांनी दाऊद इब्राहिमला विष देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पाकिस्तानातील कराची (Karachi)  येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण दाऊदला विष दिल्याबद्दलचा कोणताही अधिकृत रिपोर्ट समोर आलेला नाही.

दाऊदचे भारतातून पलायन
डी-कंपनीचा (D-Company) प्रमुख दाऊद इब्राहिम गेल्या अनेक दशकांपासून भारतातून फरार आहे. वर्ष 1993 मधील मुंबईतील बॉम्ब स्फॉटचा (Bomb Blast) कट रचणे आणि घडवून आणण्यामागे कथित रुपात त्याचा हात असल्यामुळे त्याला भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आले. भारताने कराचीत दाऊद असल्याचे सातत्याने पुरावे सादर केले, तरीही पाकिस्तान तो देशात नसल्याचे सांगत आला.

दाऊला विष दिल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, दाऊदला विष दिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. कठोर सुरक्षाव्यवस्थेतेत दाऊदला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉन आणि जियो टीव्हीसह पाकिस्तानी वृत्तसंस्थांनीही अद्याप दाऊदबद्दलच्या अशा बातम्या दिलेल्या नाहीत. कथित रुपात दाऊदला विष देण्याची माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा पाकिस्तानातील वेगवेगेळ्या शहरातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ अबू हंजलासह अन्य काही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

आणखी वाचा: 

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी