महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का. डोळ्यांमधून किडा बाहेर पडताना या महिलेने स्वतः पाहिले होते.
चीनमधील एका महिलेच्या डोळ्यांतून 60पेक्षा अधिक जिवंत किडे डॉक्टरांनी बाहेर काढलेत. डोळ्यांना खाज येण्याच्या समस्येमुळे महिला त्रस्त होती.
महिला डॉक्टरांकडे गेली असता तिच्या एका डोळ्यांतून 40 तर दुसऱ्या डोळ्यांतून 10 जिवंत किडे काढण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, डोळे व पापण्यांमध्ये असलेल्या जागेत किडे होते.
डॉक्टरांच्या मते, हे एक प्रकारचे राउंडवॉर्म फिलारियोइडिया आहे. सामान्यतः माशी चावल्याने हा त्रास होतो. महिलेच्या म्हणण्यानुसार मांजर-श्वानावरील अळ्यांमुळे ही समस्या निर्माण झाली.
जनावरांना कुरवाळणे, त्यांच्या शरीरावरील अळ्यांच्या संपर्कात येणे, मग डोळ्यांना स्पर्श केल्याने किडे डोळ्यांत गेले असतील,असे महिलेचे म्हणणे आहे. राउंडवॉर्ममुळे आंधळेपणा येऊ शकतो.
जनावरांवरील किड्यांमुळे डोळ्यांना संसर्ग झाल्यास डोळे सुजणे, डोळे दुखणे, डोळे येणे, अस्पष्ट दिसणे, पापण्यांना खाज येणे किंवा रेटिनावर जखम होणे यासारखी लक्षणे आढळतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार जनावरांवरील किड्यांमुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे. हात स्वच्छ धुवावेत.
कच्चे किंवा अर्धे शिजवलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा. उघड्यावरील अन्नपदार्थ खाताना विशेष काळजी घ्या. योग्य तापमानामध्ये खाद्यपदार्थ शिजवले जाईल, याची खात्री करून घेणे गरजेचं आहे.
आपण चष्मा वापरत असाल तर पाण्याने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चष्मा स्वच्छ करावा. तसेच आपले हातही स्वच्छ ठेवावेत.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.