सार

Las Vegas: अमेरिकेतील लास वेगासमधील विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांना मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला देखील ठार करण्यात आले आहे.

Las Vegas Shooting : अमेरिकेतील लास वेगास येथील नेवाडा विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळीबारात तीनजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या संशयित व्यक्तीला देखील ठार करण्यात आले. 

रिपोर्ट्सनुसार लास वेगासमधील पर्यटन स्थळ गँबलिंग हब (Gambling Hub) जवळ गोळीबार झाला.अमेरिकेत यापूर्वी देखील अनेक वेळा गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

घटनेवर पोलिसांचे स्पष्टीकरण
लास वेगास मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या विभागाने सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आमच्या तपासानुसार गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गोळीबारातील संशयितास ठार करण्याची माहिती आहे. 

गोळीबाराची ही घटना दिवसाढवळ्या घडली. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संशयित व्यक्ती घुसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या संशयिताने गोळीबार करण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

महिलेने दिली घटनेची माहिती
स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, “परिसरात आरडाओरडा सुरू होता. सकाळचा नाश्ता केल्यानंतर बॉम्ब स्फोटासारखे तीनदा आवाज ऐकू आले. यानंतर पुन्हा दोनदा तशाच स्वरूपाचे आवाज आले आणि आतमध्ये लोकांची धावपळ सुरू होती. यानंतर आम्ही बेसमेंटच्या दिशेने धावलो आणि तेथे 20 मिनिटे थांबलो होतो. गोळीबार सुरू झाल्यानंतर सुमारे तीन तासांनंतर लोकांना शेल्टरमध्ये पाठवण्यात आले. यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले”.

आणखी वाचा: 

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी

Israel-Hamas War : नागीण फेम अभिनेत्रीच्या बहीण-भावोजीची हमासच्या दहशतवाद्यांनी केली निर्घृण हत्या,मुलांसमोरच घेतला जीव

मला मारू नका प्लीज! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तरुणीचं केलं अपहरण, धक्कादायक VIDEO VIRAL