Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, उद्धव ठाकरे यांनी सपत्निक घेतली परिवाराची भेट

| Published : Feb 09 2024, 03:54 PM IST / Updated: Feb 09 2024, 04:08 PM IST

Abhishek Ghosalkar

सार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.

Abhishek Ghosalkar : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले आहे. पार्थिव आणल्यानंतर पत्नी, मुलीसह माजी आमदार विनोद घोसाळकर देखील रडताना दिसून आले. थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर बोरिवली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यसंस्काराआधी उद्धव ठाकरे यांनी सपत्निक परिवाराची भेट घेतली आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री आठ वाजल्याच्या सुमारास मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने फेसबुक लाइव्ह (Facebook Live) दरम्यान गोळीबार केला. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मॉरिस नोरोन्हा याने गोळीबारानंतर आत्महत्या केली. या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य राजकीय नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे दिसून आले.

नक्की काय घडले?
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा त्यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह करत होता. याच दरम्यान, मॉरिस लाइव्हमधून उठला आणि अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्याने गोळीबार केला. गोळीबारानंतर मॉरिसने देखील आत्महत्या केली. पोलिसांनी मॉरिसचा मृतदेह ताब्यात घेतला.

आणखी वाचा : 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेवर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव