सार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटला नवी ओळख मिळाली आहे. बुधवारी (7 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शरद पवार यांच्या गटाला नवे पक्षनाव बहाल केले आहे.

Sharad Pawar Group New Party Name : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  (National Congress Party ) आणि पक्षचिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेले. यामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाकडे निवडणूक आयोगाने बुधवारी (7 फेब्रुवारी) संध्याकाळ पर्यंत तीन पक्षनाव आणि तीन पक्षचिन्ह्यांचे पर्याय मागितले होते. अशातच शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला तीन पक्षनाव आणि तीन पक्षचिन्ह्यांचे पर्याय देण्यात आले. बुधवारी निवडणूक आयोगाने अखेर शरद पवारांच्या गटाला नवे नाव बहाल केले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव दिले आहे.

लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना झटका
6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने (Election Commission)  शरद पवारांच्या गटाला झटका देत अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली होती. याशिवाय शरद पवारांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या गटाने देखील सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट याचिका दाखल केली आहे.

शरद पवारांनी नव्या पक्षनाव आणि पक्षचिन्हासाठी दिले होते पर्याय
शरद पवारांच्या गटाने निवडणूक आयोगाला आपल्या पक्षासाठी तीन नाव आणि तीन चिन्ह्यांचा पर्याय दिला होता. निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.

 सूत्रांनुसार, शरद पवारांनी आपल्या गटासाठी तीन नावे दिली होती- 'शरद पवार काँग्रेस', 'एमआय राष्ट्रवादी', 'शरद स्वाभिमानी'. याशिवाय पक्षचिन्ह म्हणून 'चहाचा कप', 'सूर्यफूल' आणि 'उगवता सूर्य' असे पर्याय दिले होते. अशातच निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव दिले आहे.

अजित पवारांकडे घड्याळ गेल्याने गटाने व्यक्त केला होता आनंद
निवडणूक आयोगाने शरद पवारांना लोकसभा निवडणुकीआधी झटका देत अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह पक्षचिन्ह देखील दिले होते. यामुळे अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह मिळाल्याने आनंद व्यक्त केला होता. 

दरम्यान, गेल्या वर्षात (2023) जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. याशिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

आणखी वाचा :

अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यानंतर शरद पवारांच्या गटाकडून बॅनरबाजी

अजित पवार यांचीच खरी NCP, लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा झटका

Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App