Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम

| Published : Feb 08 2024, 12:14 PM IST / Updated: Feb 08 2024, 12:16 PM IST

 Baba Siddique resign
Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लोकसभा निवडणूकीआधी कांग्रेसला महाराष्ट्रात फार मोठा झटका लागला आहे. बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.

Baba Siddique Resigns : लोकसभा निवडणूकीआधी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसला आहे. बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. या संदर्भातील एक पोस्ट बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली आहे.

बाबा सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये म्हटलेय की, “मी तरुण असताना कांग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षातील 48 वर्षांचा प्रवास फार महत्त्वाचा होता. आज मी काँग्रेस पक्षातून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो, जे माझ्यासोबत या प्रवासात होते.”

बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी असते चर्चेत
बाबा जियाउद्दीन सिद्दीकी वर्षातून एकदा चर्चेत येतात. खासकरुन बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी नेहमीच चर्चेत असते. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार सलमान खान, शाहरुख खानसह अन्य कलाकाराही उपस्थितीत राहतात.

काँग्रेसला दुसरा मोठा झटका
मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर आता बाबा सिद्दीकींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांआधी अशी चर्चा सुरू होती की, मुंबईतील वांद्रे पूर्व येथून माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात एण्ट्री करू शकतात.

आणखी वाचा : 

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव

Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही

Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App