Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेवर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

| Published : Feb 09 2024, 10:52 AM IST / Updated: Feb 09 2024, 10:56 AM IST

Abhishek Ghosalkar Shot Dead
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेवर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर राजकरण तापले असून जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Political Leader Reactions on Abhishek Ghosalkar Shot Dead : उद्धव ठाकरे यांच्या गटातील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा (Mauris Noronha) नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याची घडना गुरुवारी घडली. या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मॉरिसने देखील गोळीबार केल्यानंतर आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. अशातच राज्यातील राजकरण तापले असून संजय राऊत(Sajay Raut), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचे ट्विट
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, “महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!”

याशिवाय संजय राऊत यांनी पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आव्हाडांनी दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये आव्हाडांनी “महाराष्ट्राचा बिहार झाला” आहे असे म्हणत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये आव्हाडांनी महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना, मागेल त्याला *बुलेट प्रूफ जॅकेट* असे म्हटले आहे.

 

विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड यांचे ट्विट
प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांना टॅग केले आहे. याशिवाय पोस्टमध्ये लाड यांनी म्हटले की, “मा. जितेंद्र आव्हाडांनी नी काही जुन्या घटना आठव्याव्या ....म्हणजे परमार ...र्थ आणि घटना आठवतील ...गंभीरबाभी चे महत्व पाहिजे असेल तर त्यांना आव्हान आहे . आपण देखील युपि / बीहार सारखं वागलं होता आठवतेय का ? का पुन्हा एकदा आठवण करावी लागेल .....”

आदित्य ठाकरे यांचे ट्विट 
उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेने आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटले की, “महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे!”

याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, “अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत ज्यांच्याकडे शस्र बाळगण्याचा परवाना आहे त्यांना बोलावले जाईल, त्यांची चौकशी केली जाईल असा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय अशा घटनांमुळे काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत असे ही बैठकीत बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : 

शिवसेना गटाचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने मृत्यू, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव