सार

आगामी लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने शरद पवारांना झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे.

EC gives NCP to Ajit Pawar : महाराष्ट्रातील राजकरण पुन्हा निवडणूक आयोगामुळे तापले गेले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षापासून विभक्त झालेल्या अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. 

खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी देखील दावा केला होता. अशातच निवडणूक आयोगाने शरद पवारांना आगामी लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections 2024) झटका देत अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. आयोगाने आपल्या आदेशात असेही म्हटले की, शरद पवारांनी आपल्या पक्षासाठी नवे पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह 7 फेब्रुवारीला मिळणार आहे.

खरंतर, शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 53 विधानसभेचे आमदार आहेत. पण गेल्या एका वर्षाआधी शरद पवार यांचा भाजा अजित पवार यांनी 41 आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली होती. बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने महाराष्ट्रातील शिंदे सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

अजित पवारांनी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा केला होता दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आमचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे म्हटले होते. पक्षासंदर्भातील दाव्याचे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले गेले. या प्रकरणात मंगळवारी (6 फेब्रुवारी) निवडणूक आयोगाने आपला निर्णय देत म्हटले की, अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय  दोन्ही गटातील आमदारांच्या आकडेवारीवरुन देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदारांपैकी 41 आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या गटात विधानसभेचे 12 आमदार आहेत.

शरद पवारांना नवे पक्षनाव आणि चिन्ह निवडावे लागणार
निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शरद पवारांच्या गटाला नवे पक्षनाव आणि पक्षचिन्ह निवडण्यास सांगितले आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता शरद पवारांच्या गटाला नवे पक्षनाव आणि चिन्ह देणार आहे.

निवडणूक आयोगाकडून लोकशाहीची हत्या- अनिल देशमुख
निवडणूक आयोगाने अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिल्यानंतर शरद पवार यांच्या गटातील वरिष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांनी म्हटले की, "संपूर्ण जगाला माहितेय राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली होती. तरीही निवडणूक आयोगाने जे केले ते लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे. "

शिवसेना पक्षातही बंडखोरी
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी केली होती. गेल्या वर्षात (2023) निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाने नवे पक्षनाव आणि चिन्ह देण्यात आले होते.

आणखी वाचा :

कच्च्या तेलाची साठवण करण्याची भूमिगत जागा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याचा ISPRLचा निर्णय

महामंडळाची होणार 234 कोटी रुपयांची बचत, राज्यातील 5000 एस टी बसेस एलएनजीवर धावणार

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हे विधान, म्हणाले…