अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यानंतर शरद पवारांच्या गटाकडून बॅनरबाजी

| Published : Feb 07 2024, 12:41 PM IST / Updated: Feb 07 2024, 12:43 PM IST

Sharad Pawar Faction Posters
अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यानंतर शरद पवारांच्या गटाकडून बॅनरबाजी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचाच पक्ष असल्याचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगाने दिला. यामुळे शरद पवारांना आपला पक्ष आणि पक्षचिन्ह गमवावे लागले आहे. अशातच शरद पवारांच्या गटाकडून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections) निवडणूक आयोगाने (Election Commission)  शरद पवारांना मोठा झटका दिला आहे. यानुसार, अजित पवारांचीच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. अशातच शरद पवारांच्या गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवारांच्या गटातील युवा सैन्याचे राज्य सचिव सरदार गुरज्योत सिंह यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. गुरज्योत सिंह यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचा मोठा फोटो देखील आहे. याशिवाय बॅनवर लिहिण्यात आलेय की, "चिन्ह तुमचे....बाप आमचा" , विजय आजही आमचाच झाला आहे.

View post on Instagram
 

शरद पवारांना गमावावे लागले पक्षचिन्ह आणि नाव
अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शरद पवारांना आपल्या पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला निर्णय देत म्हटले की, अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

दरम्यान, शरद पवारांना आपल्या पक्षाचे नवे पक्षनाव आणि पक्षचिन्ह निवडण्यास सांगितले आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता शरद पवारांच्या गटाला नवे पक्षनाव आणि चिन्ह देणार आहे.

आणखी वाचा : 

अजित पवार यांचीच खरी NCP, लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा झटका

Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App

Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही