मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. आमदार वरून सरदेसाई यांनी या दुर्घटनेवर आवाज उठवताना मुंबईतील अनियंत्रित होर्डिंगच्या समस्येवरही बोट ठेवले, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

मुंबईमध्ये मॅनहोल दुर्घटनेबाबत विधानसभेमध्ये भांडण सुरु झालं आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं दिसून आल आहे. रस्त्यानं चालता चालता माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू होतो हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून आलं. यावेळी आमदार वरून सरदेसाई यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय म्हणाले वरून सरदेसाई? 

वरून सरदेसाई यांनी या घटनेबद्दल यावेळी माहिती दिली आहे. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हे ऐकायला खूप भयानक वाटत. मुंबईच्या महापौर मागे पाहणी दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक माणूस असाच पडता पडता वाचला. यावेळी वरून यांनी होर्डिंगबद्दल आपला आवाज उठवला आहे.

होर्डिंगबद्दल वरून काय म्हणाले? 

मुंबईमध्ये होर्डिंग असण्याला आमचा विरोध नाही. पण आपण लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोमध्ये गेलात तर या होर्डिंगला एक जागा देण्यात आली आहे. पण मुंबई हे असं शहर आहे जिथं जिकडं होर्डिंग लावायची तिकडं लावायला परवानगी देण्यात आलेली आहे. या होर्डिंगचा पक्षांपासून ते लोकांपर्यंत सर्वांनाच त्रास होत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.