EPFO Portal Down : ईपीएफओ पोर्टल डाऊन झाल्याने अनेक नोकरदारांना पीएफसंबंधी कामं करताना सतत एरर येत आहे. या पीएफ पोर्टलबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक नोकरदार कर्मचाऱ्यांना पीएफ संदर्भात काही अडचणी येत आहेत. पीएफ काढण्याची प्रोसेस करताना प्रत्येकवेळी स्क्रिनवर एक एरर मेसेज येतोय. या एररबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जवळपास ७ दिवसांपासून ईपीएफओ अर्थात एम्प्लॉई प्रोविडेंट फंड ऑर्गनायजेशनचं अधिकत पोर्टल पूर्णपणे ठप्प झालं आहे. त्यामुळे कर्मचारी आपलं पासबुक तसंच इतर पीएफसंबंधी कोणतेही क्लेम करू शकत नाही. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही बंद पडलेली सर्विस २ जुलै रोजी रात्री १२ वाजता पुन्हा सुरू होणार होती. मात्र अद्यापही हे EPFO पोर्टल सुरू झालेलं नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात एकच चर्चा आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं काय आहे कारण?

सध्या बंद झालेलं पोर्टल अचानक बंद झालेलं नाही. ही डाऊनटाईमची अर्थात सेवा बंद राहण्याची प्रक्रिया २६ जूनपासून सुरू झाली होती. ही सर्विस १ जुलै रात्री ११.५९ पर्यंत बंद राहणार होती. त्यानंतर २ जुलै रात्री १२ वाजल्यापासून वेबसाइट पुन्हा सुरू होणार होती. मात्र २ जुलैचा दिवस आला तरी ही सेवा अजून सुरू झालेली नाही. ईपीएफओचं पोर्टल अद्यापही बंद असल्यामुळे नोकरदार वर्गात संताप व्यक्त होताना दिसतो आहे.

कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांसाठीही हे पोर्टल बंद आहे. पोर्टलच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे कोणालाही या साईटवर लॉगइन करता येत नाही. त्यामुळे या साईटवरील सर्व सेवा बंद पडल्या आहेत. EPF क्लेम जमा करणं, जुना क्लेमची प्रोसेस होणं, ऑनलाईन ई-पासबुक, इलेक्ट्रॉनिक चालान, नव्या कर्मचाऱ्यांसाठी यूएएन नंबर लिंक करणं, अशी कामं बंद पडली आहेत.

EPFO पोर्टल बंद ठेवण्यामागे अनेक कारणं आहेत. ईपीएफओ आपला डेटाबेस एकत्रित करण्यासाठी तसंच क्लेम प्रक्रिया सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी काम करत आहे. या नव्या अपग्रेडमुळे क्लेम प्रोसेसिंग सिस्टम अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या नव्या अपडेटनंतर पीएफसंबंधी कामं करताना युजर्सना चांगला डिजीटल अनुभव मिळेल.