महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (23 फेब्रुवारी) पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी जोशी यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिराचे बांधकाम खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात करण्यात आले आहे.
बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला होता. आता काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशानचे यूथ काँग्रेस अध्यक्षपद काढून घेतल्याचे बातमी समोर आली आहे.
AIMIM नेते वारिस पठाण यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पठाण यांनी 19 फेब्रुवारीला मीरा रोडला जाणार असल्याचे म्हटले होते. पण मला तेथे जाण्याची परवानगी नाकारल्याचे लिहिले.
अजित पवारांचाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शरद पवार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
मुंबईतील बोरिवली येथील एका महिलेने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. खरंतर महिलेने मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.
न्यूयॉर्क येथून मुंहईत आलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाला मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरंतर, व्यक्ती आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला होता.
Maratha Aarakshan Survey : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj : लंडनमध्ये (London) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा : CM एकनाथ शिंदे
शिंदे गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिंदे गटात एण्ट्री केली होती.