- Home
- Entertainment
- September Netflix OTT Releases : हॉरर, रोमान्स, थ्रीलरच्या जगात हरखून जा, इन्स्पेक्टर झेंडे लक्ष वेधून घेतील!
September Netflix OTT Releases : हॉरर, रोमान्स, थ्रीलरच्या जगात हरखून जा, इन्स्पेक्टर झेंडे लक्ष वेधून घेतील!
सप्टेंबर महिन्यात नेटफ्लिक्सवर एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. यामध्ये सस्पेन्स, हॉरर, थ्रिलर आणि रोमँसची मेजवानी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणत्या दिवशी प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.

वेनस्डे सीजन २
वेनस्डे सीजन 2 चा पहिला भाग ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्सवर आला होता. आता दुसरा भाग 3 सप्टेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. ही 6 भागांची सुपरनॅचरल मिस्ट्री कॉमेडी सीरिज असून, जेना ओर्टेगा मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत ग्वेन्डोलिन क्रिस्टी, रिकी लिंडहोम, जेमी मॅकशेन, हंटर डूहान, पर्सी हाइन्स व्हाईट, एम्मा मायर्स आणि जॉय संडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
इंस्पेक्टर झेंडे
मनोज बाजपेयी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ 5 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलर आणि कॉमेडीने भरलेला आहे. खरी घटनांवर आधारित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासोबत जिम सर्भही झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
चित्रपट सैयारा
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाने या वर्षी बॉक्स ऑफिसवर मोठा गदारोळ केला होता. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात अहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत दिसले. थिएटरमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर हा चित्रपट आता 12 सप्टेंबर रोजी ओटीटीवर येत आहे.
बॅड्स ऑफ बॉलीवूड
शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही सीरिज 18 सप्टेंबरला स्ट्रीम होणार असून, यात सहर बंबा आणि लक्ष्य ललवानी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सलमान खान, करन जौहर आणि रणवीर सिंग कॅमिओ करताना दिसतील.
हाउस ऑफ गिनीज
ऐतिहासिक ड्रामा वेब सीरिज ‘हाऊस ऑफ गिनीज’ 25 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर येत आहे. 8 भागांची ही मालिका सत्तेसाठी चाललेल्या संघर्षावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन टॉम शॅंकलँड आणि मौनिया अक्ल यांनी केले आहे. लुई पार्ट्रिज, एंथनी बॉयल, एमिली फेअरन, फिओन ओशी, डेव्हिड विल्मॉट, जेम्स नॉर्टन आणि जॅक ग्लीसन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
अॅलिस इन बॉर्डरलँड
साइन्स-फिक्शन थ्रिलर वेब सीरिज ‘अॅलिस इन बॉर्डरलँड सीजन 3’ देखील 25 सप्टेंबरला रिलीज होत आहे. या सीरिजमध्ये केंटो यामाजाकी, ताओ त्सुचिया, निजिरो मुराकामी, अयाका मियोशी, अया असाहिना, डोरी सकुरदा आणि थानेदार आओयागी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन शिंसुके सातो यांनी केले आहे.
धडक २
शाजिया इक्बाल दिग्दर्शित ‘धडक 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवल्यानंतर आता ओटीटीवर 26 सप्टेंबरपासून प्रेक्षकांसाठी उपलब्ध होत आहे. धर्मा प्रॉडक्शन्स, जी स्टुडिओ आणि क्लाऊड 9 पिक्चर्स यांनी निर्मित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2018 साली आलेल्या ‘धडक’चा सिक्वेल आहे.

