सार

मुंबईमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी मध्यरात्री रहिवाशी इमारतीतील नागरिकांच्या डोअरबेल वाजवून पळत असल्याचे दिसून येत आहे.

Viral Video :  मुंबईतील जुहू (Juhu) येथील हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका रहिवाशी इमारतीत मध्यरात्री दोन तरुणी नागरिकांच्या दाराला कडी लावून डोअरबेल वाजवून पळत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. 

रविवारी श्रेष्ठ पोद्दार नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर या घटनेसंबंधित एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेष्ठ पोद्दारने म्हटले की, आमच्या आजूबाजूच्या परिसरात चोरीचा प्रयत्न, आग लागणे किंवा हत्या झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. अशा समस्यांमुळे स्थानिक खुप वैतागले आहेत. इमारतीमधील बहुतांशजण 55 वर्षापेक्षा अधिक वयातील राहणारे आहेत.

श्रेष्ठ पोद्दारची 'X' प्लॅटफॉर्मवरील पोस्ट
श्रेष्ठ पोद्दारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी दोन शिक्षित तरुणी इमारतीत आल्या. या दोन तरुणी मुली दरवाजाला कडी लावण्यासह डोअरबेल सातत्याने वाजवत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. आमच्या इमारतीत 55 वर्षापेक्षा अधिक वयातील जेष्ठ नागरिक राहतात. याआधी आमच्या इमारतीत काही गैरप्रकार घडले आहेत.

सोशल मीडियावर युजर्सने दिल्या प्रतिक्रिया
काही युजर्सने म्हटले की, श्रेष्ठ पोद्दार याच्याशी आम्ही सहमत आहोत. अशा प्रकारामुळे इमारतीमधील स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्याने लिहिले की, हे अत्यंत वाईट आहे. याशिवाय श्रेष्ठ पोद्दारने मुंबई पोलिसांना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये टॅग देखील केले आहे.

आणखी वाचा : 

Mumbai : माझ्या सीटखाली बॉम्ब ठेवलाय...प्रवाशाच्या सूचनेनंतर विमानाचे उड्डाण थांबवले, वाचा पुढे काय घडले

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा निर्णय

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू