सार

अटल सेतूचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर अटल सेतू नागरिकांना प्रवासासाठी सुरू करण्यात आला. पण मुंबईकरांनी अटल सेतूवरुन प्रवास करताना चक्क फोटो-व्हिडीओ काढल्याचे दिसून आले. 

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) अटल सेतूचे लोकार्पण केले. सेतू नागरिकांच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आल्यानंतर तो पिकनिक स्पॉट झाल्याचे सध्या फोटो-व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडीओमध्ये मुंबईकर अटल सेतूवर गाडी थांबवून सेल्फी आणि व्हिडीओ काढत असल्याचे दिसून येत आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, काहीजणांनी आपल्या लहान मुलांना घेऊन अटल सेतूवर फोटो-व्हिडीओ काढले आहेत.

अटल सेतूवर वाहनांना थांबण्यास परवानगी नाही
अटल सेतूवर वाहने थांबवण्यास परवानगी नाही. पण तरीही मुंबईकर अटल सेतूवर गाडी थांबवून फोटो-व्हिडीओ काढू लागल्याचे दिसून आले. यापुढे आता अटल सेतूवर वाहन थांबवल्यास थेट पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

शुक्रवारी 80 हजार वाहने धावली
अटल सेतूच्या लोकापर्णानंतर 80 हजार वाहने धावल्याची माहिती देण्यात आली. पण यादरम्यान सेल्फी काढण्यासाठी सेतूवर झालेल्या गर्दीमुळे पोलिसांची चिंता वाढली गेली. मुंबईकरांच्या अशा बेशिस्तीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अटल सेतूवर वाहन थांबवल्यास FIR दाखल होणार
अटल सेतूवर सेल्फी काढण्याच्या प्रकारानंतर पोलिसांनी आपल्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म 'X'वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोलिसांनी म्हटले की, अटल सेतूवरुन जाताना वाहने थांबवणे बेकायदेशीर आहे. पोलिसांकडून नागरिकांना इशारा दिला जातोय की, वाहन चालकाने सेतूवर गाडी थांबवल्यास त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल.

अटल सेतूसाठी 17,840 कोटी रूपयांचा खर्च
अटल सेतूच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. अटल सेतू जवळजवळ 21.8 किलोमीटर रूंद आणि सहा पदरी असणारा सेतू आहे. या सेतूचा 16.6 किलोमीटरचा हिस्सा समुद्रावरुन आणि 5.5 किलोमीटरचा हिस्सा जमिनीवरुन जातो.

आणखी वाचा : 

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Atal Setu Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन, मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास 20 मिनिटांत होणार

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू