सार

Mumbai Property Tax : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (5 फेब्रुवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जाणून घ्या सविस्तर 

Mumbai Property Tax : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (5 फेब्रुवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

मुंबईकरांसाठी खूशखबर

त्यापैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करामध्ये (Property Tax ) वाढ न करण्याच्या प्रस्तावास सोमवारी (5 फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे 736 कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळणार आहे.

या संदर्भात भांडवली मुल्याधारीत करप्रणालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अंतिम निर्णयाची अंमलबजावणी करून अंतिम देयके मिळावीत यासाठी करदात्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या प्राप्त झालेल्या होत्या.

करदात्यांना सवलत देण्याचा निर्णय

कर निर्धारण (Tax assessment) व त्यानुषंगाने मालमत्ता कराबाबतची सुधारित देयके कायद्यात सुधारणा केल्यानंतर द्यावी लागणार आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888 (Mumbai Municipal Corporation Act, 1888) या कायद्यात प्रलंबित असलेली सुधारणा विचारात घेता, वर्ष 2023-24 मध्ये भांडवली मुल्य सुधारीत न करता मुंबईतील करदात्यांना सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश (ordinance) काढण्यात येईल.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

आणखी वाचा

Exclusive : ISRO प्रमुखांनी अंतराळातील यशाचा मंत्र सांगितला, एशियानेटच्या ऑफिसमध्ये चांद्रयान-आदित्य-एल1 मोहिमेवर केली चर्चा

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

Blue Flag Beaches of India : निळेशार पाणी व निसर्ग सौंदर्याने नटलेला राधानगर बीच, Watch Video