महाराष्ट्रातील भाषिक वादावर हिंदुस्थानी भाऊनं आपलं मत व्यक्त केलं आहे. मराठी भाषेचा अभिमान असला तरी इतर राज्यातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं भाऊ म्हणाला. राज ठाकरेंना उद्देशून त्यानं हिंदुत्वाला एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे.

Mumbai: सध्या महाराष्ट्रात भाषेचा वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ठाकरे बंधू हिंदी भाषा सक्तीकरणाच्या एकत्र आलेले आपण पाहिले. त्यानंतर दोघांनी वरळी येथे एकत्र येऊन मेळावा घेतला होता. हिंदुस्थानी भाऊ आता या वादात पडला असून त्यानं राज ठाकरे यांना एक विनंती केली आहे. त्यानं राज ठाकरे यांचं नाव न घेता एक आवाहन केलं आहे.

हिंदुस्थानी भाऊ काय म्हणाला? 

'हिंदुस्तानी भाऊ' म्हणाला की, "जय महाराष्ट्र! आणि हा 'जय महाराष्ट्र' आहे, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना... साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीत, महाराष्ट्रात मराठी भाषा ही केवळ 'गर्व' नाही, तर 'माज' आहे असं बोललं जातं. मराठी असल्याचा गर्वच नाही, माज आहे. पण साहेब, याच मराठीच्या नावाखाली इथे आलेल्या भारतातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं आहे." असं त्यानं म्हटलं आहे.

View post on Instagram

शाळेच्या शिक्षणाबाबत हिंदुस्थानी बोलला

"शाळेत असो वा कॉलेजमध्ये, मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी तुम्हाला जेवढी ताकद लावायची आहे, ती लावा साहेब. संपूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण साहेब, गरिबांना मारणं खूप चुकीचं आहे. ते इथे फक्त नोकरी-धंद्यासाठी आले आहेत. आज आपले महाराष्ट्रातील लोकंही दुसऱ्या राज्यांत शिक्षण घेण्यासाठी किंवा कामधंद्यासाठी जातात. तिथे जर याच कारणामुळे आपल्या मराठी लोकांना मारलं गेलं, तर तुम्ही काय करणार, साहेब?" असं हिंदुस्थानी भाऊ म्हटलं आहे.

हिंदुत्वाला एकत्र घेऊन या हिंदुस्थानी भाऊ म्हणाला, "कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब, पण सगळ्यांना एकत्र आणणं खूप कठीण असतं. हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. कारण बाळासाहेबांनंतर त्यांची सावली राजसाहेबांमध्ये बघितली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, असं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात साहेब."