MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!

धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!

Mumbai 15 coach local trains: पश्चिम रेल्वेने मुंबईकरांना दिलासा देत १९ मार्चपासून १२ डब्यांच्या १६ उपनगरीय फेऱ्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवासी क्षमता २५% वाढणार असून ८ अतिरिक्त फेऱ्यांचा फायदा प्रवाशांना मिळेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 18 2026, 04:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मुंबईकरांना मोठा दिलासा!
Image Credit : our own

मुंबईकरांना मोठा दिलासा!

मुंबई: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल मधील 'तुडुंब' गर्दीतून सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच १९ मार्च पासून पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांच्या गाड्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
उद्यापासून नेमका काय बदल होणार?
Image Credit : SOCIAL MEDIA

उद्यापासून नेमका काय बदल होणार?

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून १२ डब्यांच्या १६ उपनगरीय फेऱ्यांचे रुपांतर १५ डब्यांमध्ये केले जाणार आहे. चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'मध्ये तयार करण्यात आलेल्या या अत्याधुनिक कोचची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहेत. 

Related Articles

Related image1
सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!
Related image2
ठाणे-मुलुंडकरांसाठी मोठी गुड न्यूज! नव्या रेल्वे स्टेशनला २५० कोटींचा निधी मंजूर; 'हे' नाव देण्याची आग्रही मागणी
34
गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठी लॉटरी!
Image Credit : social media

गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठी लॉटरी!

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवांच्या नियोजनात खालील महत्त्वाचे बदल होतील:

एकूण फेऱ्या: १५ डब्यांच्या सेवांची संख्या आता २११ वरून २२७ वर पोहोचेल.

पीक अवर फायदा: वाढवलेल्या १६ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या ऐन गर्दीच्या वेळी चालवल्या जातील.

सकाळ-संध्याकाळ: यात सकाळच्या ४ आणि संध्याकाळच्या ४ विशेष फेऱ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे कामावर जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. 

44
विरार-अंधेरीनंतर आता वांद्रेपर्यंत विस्तार!
Image Credit : fb

विरार-अंधेरीनंतर आता वांद्रेपर्यंत विस्तार!

पश्चिम रेल्वे केवळ १५ डबे वाढवून थांबलेली नाही, तर या सेवांचा विस्तार आता वांद्रे स्थानकापर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे: विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

फायदा: हे काम पूर्ण होताच विरारहून सुटणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल थेट वांद्रेपर्यंत धावू शकतील.

जास्तीचे ३ डबे म्हणजे प्रत्येक फेरीत किमान २५% अधिक प्रवासी सामावून घेण्याची क्षमता!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganpati Festival : बीएमसीकडून शाडू मातीचा पुरवठा उशिरा; गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी
Recommended image2
Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चारहून अधिक जखमी
Recommended image3
Mumbai Weather Update : मुंबईत उकाड्यासोबत पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचा अंदाज
Recommended image4
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image5
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Related Stories
Recommended image1
सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!
Recommended image2
ठाणे-मुलुंडकरांसाठी मोठी गुड न्यूज! नव्या रेल्वे स्टेशनला २५० कोटींचा निधी मंजूर; 'हे' नाव देण्याची आग्रही मागणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved