सार

मुंबईतील बोरिवली येथील एका महिलेने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. खरंतर महिलेने मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.

Crime News :  बोरिवली (Borivali) येथील एका आईने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महिला मानसिक रुपात आजारी असून तिच्यावर उपचार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांपासून महिनेलेन औषध घेणे बंद केले होते. गुरुवारी (15 फेब्रुवारी) रात्री मुलीची हत्या केल्यानंतर स्वत: देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने या घटनेबद्दलची माहिती कस्तुरबा पोलिसांना दिली. यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहिले की, महिला जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या बाजूला मुलीचा मृतदेह होता. याशिवाय मुलीच्या गळ्याला ओढणी बांधल्याचे दिसून आले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला मानसिक रुपात आजारी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या दहा वर्षांपासून महिला आपल्या आजारावर उपचार घेत आहेत. पण गेल्या तीन दिवसांपासून महिलेने औषध घेतली नव्हती.

नक्की काय घडले?
11 वर्षीय मुलीचे नाव रुहानी सोलंकी होते. रुहानीच्या गळ्याला ओढणी बांधल्याचे पाहिल्यानंतर वडिलांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिलेचे नाव रेखा असून ती 46 वर्षांची आहे.

गुरुवारी रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी परिवारातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. यानंतर आईने मुलीसह स्वत: ला एका खोलीत बंद करून घेतले. यादरम्यान, वडील घराच्या हॉलमध्ये बसलेले होते. वडिलांनी आपली मुलगी खोलीतून ओरडत असल्याचा आवाज ऐकला. पण थोड्यावेळाने खोलीतून आवाज आलाच नाही. खोलीचे दार ठोठावूनही ते उडण्यात आले नाही अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती.

आणखी वाचा : 

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले

संतापजनक! मित्रानेच मैत्रिणीवर केला बलात्कार; आठवडाभर केला छळ, अंगावर ओतायचा गरम डाळ

कांदिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, शाळेविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन सुरू