कांदिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, शाळेविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन सुरू

| Published : Feb 05 2024, 02:21 PM IST / Updated: Feb 05 2024, 02:33 PM IST

rape 1

सार

कांदिवली येथील एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात समतानगर पोलिसांनी एका शाळेतील शिपायाला अटक केली आहे.

School Girl Sexually Assault by Peon : कांदिवली  येथील एका शाळेतील चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात समतानगर पोलिसांनी शाळेतील एका शिपायाला अटक केली आहे. सध्या शाळेबाहेर 200 हून अधिक जणांकडून आंदोलन केल्याचे रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे.

नक्की काय घडले?
रिपोर्ट्सनुसार, कांदिवली येथील एका शाळेतील शिपायाने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर पीडित मुलीला वॉशरुममध्ये घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडित अल्पवयीन मुलगी घरी आली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या. यासंदर्भात मुलीला आईने विचारले असता तिने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तातडीने पोलीस स्थानक गाठत शिपायाच्या विरोधात तक्रार केली.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर समता नगर पोलिसांकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) आरोपी शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखवला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : 

US : अमेरिकेत मृताव्यस्थेत सापडला भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डी, यंदाच्या वर्षातील चौथी घटना

भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 जणांना सुनावली फाशीची शिक्षा

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू