'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले

| Published : Feb 16 2024, 10:29 AM IST / Updated: Feb 16 2024, 10:33 AM IST

phone call
'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशातील बरेली येथे माजी आमदाराला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माजी आमदाराला फोनवरील व्यक्तीने अमित शाह बोलत असल्याचे सांगितले.

Crime News :  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथे लोकसभा निवडणुकीआधी तिकिट देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने फोनवर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बोलत असल्याचे सांगितले. आरोपीने फोनवर माजी आमदाराला निवडणुकीसाठी तिकिट देतो सांगत पैशांची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एकाने पळ काढला आहे.

बरेली जिल्ह्यातील नवाबगंज जिल्ह्यात व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाइल फोटो लावला. यानंतर माजी आमदाराला फोन करत निवडणुकीसाठी तिकिट मिळवून देतो असे सांगत पैशांची मागणी केली.

पोलिसांनी या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो वापरुन नेत्यांना तिकिट देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. अशी तक्रार करण्यात आली होती की, तिकिट देणाच्या नावाखाली फसवणूकदार नेते आणि कार्यकर्त्यांकडून पैशांची मागणी करतात.

या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता, रविंद्र मौर्य नावाचा व्यक्ती नवाबगंज जिल्हा बरेली येथे राहणारा असल्याचे समोर आले. रविंद्र मौर्य याने 4 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 दरम्यान नऊ वेळा माजी आमदार किशनलाल राजपूत यांना फोन केला होता. यावेळी रविंद्र आपण अमित शाह बोलत अशल्याचे माजी आमदारांना सातत्याने सांगत होता.

पोलिसांना कळताच सिम कार्ड तोडले
पोलिसांनी पुढे सांगितले की, रविंद्र मौर्यला पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे कळता त्याने सिम कार्ड तोडले. ज्या क्रमांकावरुन माजी आमदारांना फोन करण्यात येत होता तो क्रमांक रविंद्र मौर्य याच्याच गावातील हरीश पुत्र तिलकराम याच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचे समोर आले. हरीशची चौकशी केली असता, त्याने 29 डिसेंबर 2023 रोजी सिम कार्ड खरेदी केल्याचे सांगितले. नंतर रविंद्र मौर्य आणि शाहिद याने धमकावून माझे सिम कार्ड घेतल्याची माहिती हरीशने पोलिसांना दिली. रविंद्र याला पोलिसांनी पोलीस स्थानकात बोलावले असता त्याने सिम कार्ड तोडले.

ट्रुकॉलरवर केंद्रीय गृहमंत्र्यांचे नाव लावले
ट्रुकॉलवर (Truecaller) केंद्रीय गृहमंत्र्यांचे नाव येत होते. खरंतर हे सर्व शाहिद आणि रविंद्र मौर्य यांनी केले होते. या प्रकरणात शाहिद याने पळ काढला आहे. पोलिसांना असा संशय आहे की, शाहिदने याआधी देखील अशाच प्रकारे फसवणूक केली असावी.

आणखी वाचा : 

Sonia Gandhi Shifts To Rajya Sabha : सोनिया गांधींकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल

'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...' IndiGo च्या विमानातील टिश्यू पेपरवर लिहिलेल्या मेसेजने खळबळ

कतारच्या तुरुंगातून आठ पैकी सात माजी नौसैनिक भारतात परतले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार (Watch Video)