संतापजनक! मित्रानेच मैत्रिणीवर केला बलात्कार; आठवडाभर केला छळ, अंगावर ओतायचा गरम डाळ

| Published : Feb 07 2024, 02:30 PM IST / Updated: Feb 07 2024, 03:51 PM IST

Rape

सार

New Delhi News : दिल्लीतील दक्षिण भागामध्ये एका महिलेवर तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या नराधमाने आठवडाभर तिचा छळ देखील केला.

 

New Delhi News : बलात्काराच्या घटनेने राजधानी नवी दिल्ली पुन्हा हादरली आहे. 28 वर्षांच्या एका तरुणाने स्वतःच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पीडित महिलेवर आठवडाभर बलात्कार करत होता, अशी संतापजनक माहितीही समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्याने अतिशय निर्दयीपणे पीडितेचा छळ देखील केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी पीडित महिलेसोबत एकाच घरामध्ये राहत होता. 

दरम्यान महिलेवर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यात आले आहेत. तिच्या शरीरावर 20हून अधिक जखमा आढळून आल्या आहेत. पीडित महिला मूळची दिल्लीतील रहिवासी नसल्याचे समजत आहे.

आरोपीने केलेल्या शारीरिक छळामुळे पीडितेच्या शरीरावर गंभीर स्वरुपात जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी मंगळवारी (6 फेब्रुवारी 2024) सांगितले की, आरोपी महिलेच्या अंगावर गरम डाळ ओतायचा. पारस (वय 28 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उपचारांनंतर महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोपीसह महिनाभर एकत्र राहत होती महिला

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपी पारससह भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या घरामध्ये जवळपास महिनाभरापासून एकत्र राहत होती. पारससोबत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तिची मैत्री होती. दरम्यान मित्राकडून पीडित महिलेचा छळ होत असल्याची माहिती 30 जानेवारी रोजी फोनद्वारे स्थानिक पोलिसांनी मिळाली. त्यावेळेस हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

आरोपीने मैत्रिणीला दिले होते वचन

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पीडित महिलेची सुटका करण्यात आली आणि उपचारांसाठी तिला AIIMS हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. 2 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून काम मिळवण्यासाठी ती बंगळुरूमध्ये जाण्याचा विचार करत होती. पारस आणि तिची भेट दिल्लीमध्ये झाली होती. यादरम्यान पारसने तिला नोकरी शोधण्यामध्ये मदत करण्याचे वचन दिले. त्यानेच तिला दिल्लीमध्ये राहण्यास सांगितले होते.

पोलीस करताहेत तपास

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार 30 जानेवारी रोजी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पारस हा मूळचा उत्तराखंडमधील रहिवासी आहे. तो दिल्लीतील एका भोजनालयामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

आणखी वाचा

VIDEO : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, पत्नीने परराष्ट्र मंत्र्यांना मदतीसाठी लिहिले पत्र

MP Harda Factory Blast : फटाके कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक, स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू

राजस्थान येथे महंताची हत्या, आश्रमात सापडला मृतदेह