सार

मुंबईतील उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य लोकसभेच्या जागेवरील उमेदवारांची घोषणा राजकीय पक्षांनी केलीय. पण अद्याप चार लोकसभेच्या जागांबद्दल महाविकास आघाडी आणि एनडीएकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. 

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या जोर पकडला आहे. पण मुंबईतील सह लोकसभेच्या जागांवर उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात राजकीय पक्ष घाई करत नाहीय. अद्याप याबद्दल विचार केला जातोय. खरंतर, लोकसभेच्या सहा जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT Shiv Sena) गटाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अशातच मुंबईतील उत्तर-मध्य (North-Central Seat) लोकसभेच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांते लक्ष आहे. रविवारी (31 मार्च) काँग्रेस नेते संजय निरुपम मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा होती. पण निरुपम यांनी शांत राहणेच योग्य मानले.

मुंबईत पाचव्या टप्प्यात निवडणूक
मुंबईत पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. यासाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या 3 मे पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे.

भाजपच्या उमेदवाराच्या घोषणेकडे काँग्रेसचे लक्ष
भाजपच्या एका नेत्यांनी म्हटले की, केंद्रीय निवडणूक समिती फार विचार करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहे. मुंबईत अद्याप निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास एक महिना आहे. यामुळे राजकीय पक्षांकडून विचार आणि वेळ घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.

दरम्यान, मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभेच्या जागेवरून पूनम महाजन यांच्या एवजी भाजपकडून आशीष शेलार किंवा एखाद्या सिनेकलाकाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईतील उत्तर-मध्य जागेवरील उमेदवार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर-पूर्व लोकसभेच्या जागेवरून भाजपने मनोज कोटक यांचे तिकीट कापत मिहिर कोटेचा यांना संधी दिली आहे. याशिवाय मुंबईतील उत्तर लोकसभेच्या जागेवरून गोपाल शेट्टी यांच्या एवजी पीयूष गोयल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अशातच असा अंदाज लावला जातोय की, उत्तर-मध्य जागेवरून भाजपकडून कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाईल.

महाविकास आघाडीमधील उत्तर-मध्य सीट काँग्रेसच्या खात्यात आहे. वर्ष 2009 मध्ये उत्तर-मध्य जागेवरून खासदार राहिलेल्या प्रिया दत्त राजकरणापासून दूर राहत असल्याचे दिसून येतेय. काँग्रेसकडून माजी मंत्री नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. खरंतर, काँग्रेसकडून उत्तर-मध्य जागेवरून भाजप कोणाला उतरवणार याची वाट पाहत आहे. यानंतरच काँग्रेसकडून आपल्या उमेदवाराची घोषणा केली जाऊ शकते.

दक्षिण मध्य जागा महत्वाची
देशातील प्रतिष्ठित दक्षिण मुंबईच्या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजप, शिंदे यांची शिवसेना किंवा मनसेच्या खात्यात दक्षिण मध्य जागा जाणार का याचा पेच अद्याप सुटलेला नाही. याचाच परिणाम म्हणजे या मुद्द्यावर महायुतीला उमेदवार जाहीर करता आलेला नाही.

दुसऱ्या बाजूला उत्तर मुंबईत पियूष गोयल यांच्या समोर कांग्रेस कोणाला उतवरणार याचीही चर्चा सुरू आहे. भाजपचा गढ असलेल्याउत्तर मुंबईत काँग्रेसने 2019 मध्ये सिनेकलाकाराला उतरवले होते. यंदाही एखाद्या सिनेकलाकाराला संधी काँग्रेस देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्यावेळी उर्मिला मातोंडकरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. अभिनेत्री स्वरा भास्करसंदर्भात काँग्रेसध्ये मंथन सुरू आहे. पण उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास वेळ लागू शकतो.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील दक्षिण मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना लढणार, राहुल शेवाळेंचा विजय होणार?

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही..