सार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नाशिकच्या जागेचाही पहिल्या यादीत उल्लेख नसल्यामुळे हा मतदारसंघ भाजपा किंवा राष्ट्रवादीच्या पारड्यात गेला आहे का? अशी शंका घेतली जात आहे.

 

शिंदे सेनेनं जाहीर केलेल्या ८ जागांपैकी ७ जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तिथं काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली, ठाणे, वाशिम-यवतमाळ व नाशिक मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. या पाचही मतदारसंघावर महायुतीतील भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे.

शिंदे गटात अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेश:

भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला अभिनेता गोविंदा आज शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे. काही वेळापूर्वीच गोविंदाने हाती भगवा झेंडा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत. त्याची सुरुवात गोविंदाच्या पक्ष प्रवेशाने झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. राम नाईक यांचा पराभव करणारा गोविंदा आता शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे.

आणखी वाचा :

सीएम केजरीवाल यांना दिलासा नाही, ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

MDMK चे खासदार गणेशमूर्ति यांचे निधन, दोन दिवसांआधी केला होता आत्महत्येचा प्रयत्न

2024 Mood of the Nation Survey: पंतप्रधानांच्या चेहऱ्यासाठी नरेंद्र मोदी आघाडीवर, 79% लोकांचे मत - एनडीए सरकार पुन्हा स्थापन व्हावे