सार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये उद्धव ठाकरे ते सुषमा अंधारे यांची नावे आहेत.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर करण्यासह आता स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यादीत उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह 40 जणांच्या नावाचा समावेश आहे.

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने याआधी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे.

  • उद्धव ठाकरे
  • आदित्य ठाकरे
  • संजय राऊत
  • आदेश बांदेकर
  • सुभाष देसाई
  • अनंत गिते
  • चंद्रकांत खैरे
  • अरविंद सावंत
  • भास्कर जाधव
  • अनिल देसाई
  • ॲड. अनिल परब
  • राजन विचारे
  • सुनील प्रभू
  • अंबादास दानवे
  • वरुण सरदेसाई
  • रवींद्र मिर्लेकर
  • विशाखा राऊत
  • नितीन बानुगडे-पाटील
  • लक्ष्मण वडले
  • प्रियांका चतुर्वेदी
  • सचिन अहिर
  • मनोज जामसुतकर
  • सुषमा अंधारे
  • संजय जाधव
  • किशोरी पेडणेकर
  • ज्योती ठाकरे
  • संजना घाडी
  • शीतल शेठ-देवरुखकर
  • जान्हवी सावंत
  • शरद कोळी
  • ओमराजे निंबाळकर
  • सुनील शिंदे
  • विलास पोतनीस
  • वैभव नाईक
  • नितीन देशमुख
  • आनंद दुबे
  • किरण माने
  • सुभाष वानखेडे
  • प्रियंका जोशी

दरम्यान, राज्यात निवडणुका पाच टप्प्यात होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेवेळी केली आहे. या मतदानाचे निकाल 4 जून रोजी समोर येणार आहेत.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही..

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज नेत्यांना दिलीय जबाबदारी

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समोर आली ही नावे