Lok Sabha Election 2024 : मुंबईतील दक्षिण मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना लढणार, राहुल शेवाळेंचा विजय होणार?

| Published : Mar 30 2024, 07:40 AM IST / Updated: Mar 30 2024, 08:19 AM IST

Rahul Shewale

सार

मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभेची जागा फार महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यामुळे राहुल शेवाळेंचा विजय होणार का? याचे गणित जाणून घेऊया सविस्तर...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. याशिवाय राजकीय पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली जात आहे. अशातच शिवसेना विरूद्ध शिवसेना (Shiv Sena vs UBT Shiv Sena) अशी लढत निवडणुकीवेळी होणार आहे.

मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभेची जागा (Mumbai South Central Seat) अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांची शिवसेना यांच्यामधील कोणता उमेदवार जिंकणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खरंतर, एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून अनिल देसाई (Anil Desai) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे अनिल देसाई विरूद्ध राहुल शेवाळे यांच्यामध्ये लढत होणार आहे. पण राहुल शेवाळे यांना विजय मिळवणे थोडे मुश्किल असल्याचेही बोलले जात आहे.

दीड लाख मतांनी जिंकले होते शेवाळे
वर्ष 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीवेळी राहुल शेवाळे दीड लाख मतांनी जिंकले होते. यावेळी शेवाळे यांच्या विरोधात उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव झाला होता. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळेंना विजय मिळणे सोपे नसणार असल्याचे मानले जातेय.

स्थानिकांच्या मते, याआधीच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट नव्हते. पण आता पक्षात फुट पडली आहे. पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. यामुळे नागरिक कोणत्या शिवसेनेच्या गटाला अधिक मत देणार हे अद्याप कळत नाहीय.

गेल्या दोन वर्षांमध्ये जे काही झालेय यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आबे. याशिवाय दक्षिण-मध्य मुंबईतील जागेवर दलित आणि मुस्लीम मतदार मोठा फॅक्टर आहे . जर शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन झाल्यास आणि इंडिया आघाडीतील (I.N.D.I.A. Alliance)  अनिल देसाई यांना मत मिळाल्यास राहुल शेवाळांचे विजय होणे मुश्कील आहे. 

आणखी वाचा : 

Mumbai Railway Stations Name : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांना मिळणार ही नवी नावे, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही..

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दिग्गज नेत्यांना दिलीय जबाबदारी

Read more Articles on