सार

चेन्नई येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका इंडिगोच्या विमानाला कथित रुपात बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानातील टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर धमकीचा मेसेज लिहिण्यात आला होता.

Bomb Threat Message in IndiGo Flight : चेन्नई येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. इंडिगोचे 6E-5188 विमान मुंबई विमानतळावर उतरणार होते. यादरम्यान, विमानतील टॉयलेटमधील टिश्यू पेपरवर विमानात बॉम्ब असल्याचा मेसेज लिहिण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील टॉयलेटच्या टिश्यू पेपरवर माझ्या बॅगेत बॉम्ब आहे असा मेसेज लिहिला होता. याशिवाय विमान मुंबईतील विमानतळावर उतरल्यास आपण सर्वजण जीव गमावू, मी एका दहशतवादी संघटनेमधील असल्याचेही मेसेजमध्ये लिहिले होते. या धमकीच्या मेसेजमुळे विमानात खळबळ उडाली.

प्रवासी सुरक्षित, तपासात काही हस्तगत झालेले नाही
विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेजनंतर पोलीस आणि अन्य तपास यंत्रणांना याबद्दल माहिती देण्यात आली. विमान विमानतळावर उतरल्यावर तातडीने सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले. पण विमानात तपास केला असता काहीही हाती लागले नाही. मुंबई विमानतळाच्या पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

मुंबई विमानतळाला उडवण्याची मिळाली होती धमकी
गेल्या वर्षात (2023) नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. कथित रुपात धमकी देणाऱ्याने पैशांची मागणी केली होती. याशिवाय दिल्ली विमानतळालाही उडवण्याची धमकी गेल्या वर्षात मिळाली होती.

आणखी वाचा : 

Viral Video : ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील कर्मचाऱ्याचा संतापजनक प्रकार उघडकीस, कुत्र्याला ग्रुमिंगच्या नावाखाली मारहाण

मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला कार्यालय उडवून देण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल

Viral Video : रहिवाशी इमारतीत तरुणींचा उच्छाद, मध्यरात्री नागरिकांच्या दाराला कडी लावली आणि.…