सार
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला धमकीचा इमेल आला आहे. धमकीचा इमेल आल्याने मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Threat email to US consulate general : मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (Bandra-Kurla Complex) येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला एक धमकीचा इमेल आला आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती देत म्हटले की, धमकीचा इमेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा इमेल 9 फेब्रुवारीला आला होता. यानंतर अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.
इमेलमध्ये काय लिहिले होते?
रिपोर्ट्सनुसार, एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला धमकीचा इमेल पाठवल्याने एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर आयपीसी कलम 505 (1)(B) आणि 506(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. धमकीचा इमेल इंग्रजी भाषेत लिहिल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाजवळील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
या प्रकरणात गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला जात असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय इमेलचा आयपी अॅड्रेस (IP Address) ट्रेस करण्याचाही प्रयत्न केला जातोय. याशिवाय ज्या व्यक्तीने धमकीचा इमेल पाठवलाय त्याचाही शोध घेतला जात असून आता अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
आणखी वाचा :
कांदिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, शाळेविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन सुरू