सार

बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला होता. आता काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशानचे यूथ काँग्रेस अध्यक्षपद काढून घेतल्याचे बातमी समोर आली आहे.

Mumbai Youth Congress New President : झिशान सिद्दीकीला (Zeeshan Siddiqui) मुंबई यूथ काँग्रेस पदावरुन हटवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या पदाची जबाबदारी आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याकडे दिल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला झिशानचे वडील बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला होता. अशातच आता काँग्रेसने झिशानसंदर्भात मोठा निर्णय घेत त्याला पदावरुन हटविले आहे.

झिशान सिद्दीकी सध्या वांद्रे (पूर्व) येथील आमदार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यासाठी झिशानसोबत अजित पवार आणि अन्य नेत्यांची भेट घेतली होती.

बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये  बाबा सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, “मी तरुण असताना कांग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षातील 48 वर्षांचा प्रवास फार महत्त्वाचा होता. आज मी काँग्रेस पक्षातून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो, जे माझ्यासोबत या प्रवासात होते.”

आणखी वाचा : 

AIMIM नेते वारिस पठाण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, माजी आमदाराने मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन असल्याचा लावला आरोप

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न