AIMIM नेते वारिस पठाण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, माजी आमदाराने मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन असल्याचा लावला आरोप

| Published : Feb 20 2024, 11:22 AM IST / Updated: Feb 20 2024, 11:29 AM IST

AIMIM
AIMIM नेते वारिस पठाण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, माजी आमदाराने मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन असल्याचा लावला आरोप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

AIMIM नेते वारिस पठाण यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पठाण यांनी 19 फेब्रुवारीला मीरा रोडला जाणार असल्याचे म्हटले होते. पण मला तेथे जाण्याची परवानगी नाकारल्याचे लिहिले. 

Mira Road : मुंबई पोलिसांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) माजी आमदार आणि एआयएमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण (Waris Pathan) यांनी ताब्यात घेतले. खरंतर, वारिस पठाण मीरा रोडच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुंबईत जानेवारी महिन्यात मीरा रोड जवळ दोन गटात हाणामारी झाली होती.

वारिस पठाण यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पठाण यांनी म्हटले, मी पोलिसांना सांगितले होते येत्या 19 फेब्रुवारीला मीरा रोडला जाणार आहे. पण मला तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. याशिवाय वारिस पठाण यांनी एक व्हिडीओ देखील पोस्टसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एआयएमआयएमचे कार्यकर्त्यांकडून करण्यात येणाऱ्या घोषणाबाजी दरम्यान त्यांना पोलिसांच्या व्हॅनपर्यंत नेले जात असल्याचे दिसून येत आहे. 

पोलीस आयुक्तांना भेटायचे होते…
वारिस पठाण यांनी म्हटले की, त्यांना मुंबई पोलिसांनी अशावेळी ताब्यात घेतले ज्यावेळी ते द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांना निवदेन देण्यासाठी जात होतो. अन्य एका पोस्टमध्ये वारिस पठाण यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मला त्या व्यक्तींच्या विरोधात निवेदन सोपवण्यासाठी आयुक्तांना भेटायचे होते जे द्वेषपूर्ण भाषण देण्यासह जातीय वाद निर्माण करत आहेत. पण मला ताब्यात घेण्यात आले. याआधी मुंबई पोलीस 18 फेब्रुवारीला पठाण यांच्या निवासस्थानी पोहोचत त्यांना CRPC च्या कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली होती.

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही वारिस पठाण मीरा रोडला जात असताना त्यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी मुंबई पोलिसांवर आरोप लावत म्हटले की, “माझ्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. याशिवाय मला कुठे घेऊन जातायत हे देखील माहिती नाही”  असेही पठाण यांनी म्हटले. 

आणखी वाचा : 

मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने दीड किलोमीटर पायी चालत गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

Viral Video : ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील कर्मचाऱ्याचा संतापजनक प्रकार उघडकीस, कुत्र्याला ग्रुमिंगच्या नावाखाली मारहाण