सार
लोकसभा निवडणुका लवकरच होणार असून भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याची 9 वी यादी जाहीर करायची आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच होणार असून भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याची 9 वी यादी जाहीर करायची आहे. या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना तिकीट जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना परत मिळणार तिकीट?
भाजपकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे नाव चर्चेत आहे. त्यांचे नाव पुढील यादीत भाजपकडून जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सातारा लोकसभेतून उदयनराजे भोसले यांना तिकीट जाहीर झाल्यास येथून शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांची लढत होऊ शकते.
साताऱ्यात कोणाला मिळेल तिकीट? -
भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असे उदयनराजे भोसले यांना सुचवण्यात आले होते पण त्यांनी यासाठी नकार दिला. आता उदयनराजे भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळाल्यास ते राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतात का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा -
छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 12 मजुरांचा झाला घटनास्थळी मृत्यू
'Hiring Junior Wife! अनुभवही नको'; लिंक्डइनवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया