छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 12 मजुरांचा झाला घटनास्थळी मृत्यू

| Published : Apr 10 2024, 08:37 AM IST

Chhattisgarh Durg Bus Accident

सार

बस दरीत कोसळून भीषण अपघात घडल्याची दुर्घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. या बस अपघातात 12 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बस दरीत कोसळून भीषण अपघात घडल्याची दुर्घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. या बस अपघातात 12  मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्तीसगढ मधील दुर्ग येथे अपघात झाल्याची ही घटना घडली आहे. या अपघातात ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बस दरीत कोसळून भीषण अपघात - 
छत्तीसगढ राज्यातील रायपूर - दुर्ग रोडवर हा अपघात झाला आहे. या बसमध्ये कर्मचारी बसलेले असून या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समजली आहे. ही बस दरीत कोसळल्यानंतर 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि जखमींपैकी 10 मजुरांची स्थिती गंभीर असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, छत्तीसगडच्या दुर्गमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, मी सदिच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे."
आणखी वाचा - 
पुणे विद्यापीठात लव्ह जिहादच्या आरोपाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
धक्कादायक! पैश्यांसाठी मैत्रिणीचे अपहरण केले, खून करून जाळून पुरले