सार

दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल 95. 81 टक्के दहावीचा निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्वात चांगला लागला आहे. कोकण विभागाचा बारावीचा निकाल सर्वात जास्त लागला होता. त्यांनी तीच परंपरा दहावीच्या निकालात ठेवली आहे. 

कोणत्या विभागाचा किती निकाल लागला? - 
नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह सर्व विभागांमध्ये खाली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा निकाल हा 100% लागला असून मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत निकाल लागायच्या तासभर आधी अशा प्रकारची माहिती दिली जाते. 

दहावीच्या परीक्षेसाठी किती मुलांनी केली होती नोंदणी? - 
हावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. आता तो निकाल एक वाजता लागणार असून यावेळी निकालाची प्रत आपण डाउनलोड करू शकणार आहेत. आपण विभागनिहाय टक्केवारी जाणून घेऊयात. 

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

  • पुणे : 96.44 टक्के
  • नागपूर : 94.73 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
  • मुंबई : 95.83 टक्के
  • कोल्हापूर : 97.45 टक्के
  • अमरावती : 95.58 टक्के
  • नाशिक : 95.28 टक्के
  • लातूर : 95.27 टक्के
  • कोकण : 99.01 टक्के

आणखी वाचा - 
पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर सेवेशी केली गद्दारी, डॉ. अजय तावरे यांना अटक
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून करण्यात आला गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण