सार

मालगेवमध्ये रात्री राजकीय व्यक्ती असणाऱ्या माजी महापूर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आला असून नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मालेगावमध्ये रात्री राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला असून यामध्ये मलिक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 

मलिक चहा पीत असताना झाला हल्ला - 
मलिक हे चहा पीत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मालेगाव येथे तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. या हल्ल्यामुळे नाशिक जिल्हा ढवळून निघाला आहे. 

कसा झाला हल्ला - 
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक हे मध्यरात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी येथे काही अज्ञात अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांच्याजवळ जवळून हल्ला करण्यात आला होता आणि जवळून त्यांच्यावर हा तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अब्दुल यांच्या हात आणि पायामध्ये गोळी झाडण्यात आली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोरांना लवकर पकडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. 
आणखी वाचा -