सार
कचाथीवू प्रकरणात सध्या भाजप आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
कचाथीवू प्रकरणात सध्या भाजप आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 974 मध्ये इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत भारत आणि श्रीलंका यांच्यात कचाथीवू बेटावर झालेल्या करारावर काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यावर काँग्रेस आणि द्रमुककडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
श्रीलंकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
यावर श्रीलंकेच्या एका अधिकाऱ्याने त्याच मत व्यक्त केलं आहे. त्याच्या मते अनेक दशकानंतर कचाथीवूचा मुद्दा उपस्थित करणे ही दिल्लीची बाब आहे. कचाथीवू बेट हा जाफना राज्याचा भाग होता आणि 1970 च्या दशकात दोन्ही देशांतील 'ज्ञानी व्यक्तींनी' करारावर स्वाक्षरी केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही देशांमध्ये निवडणूका आल्या असून यावर बोलणे योग्य ठरणार नाही असं म्हटलं आहे.
भाजपने केली काँग्रेसवर टीका -
31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला दिलेले कचाथीवू बेटावरील ग्रँड ओल्ड पार्टीवर जोरदार टीका केली होती. पाल्क स्ट्रेट ते ॲडम्स ब्रिजपर्यंतच्या ऐतिहासिक पाण्यात दोन्ही देशांमधील सीमारेषा निश्चित करण्यासाठी हा करार करण्यात आला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसने मच्छिमारांचे हक्क काढून घेतल्याचं म्हटले आहे.
केंद्रातील भाजप सरकार आणि विरोधी पक्षांमधील हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी यासंदर्भातील माहिती अधिकारातून माहिती काढल्यानंतर याबाबतच्या वादाला तोंड फुटले. कचाथीवू प्रकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद विवाद चालू असून निवडणुकीच्या तोंडावरच यावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा -
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट
Rules Change from 1st April : पॅन कार्ड आधारला लिंक ते फास्टॅगच्या नियमात बदल, आजच करा हे काम