सार

नवे आर्थिक वर्ष 2024-24 सुरू झाले आहे. यासोबत काही नियमांत बदलही करण्यात आले आहेत. 1 एप्रिल पासून पॅन कार्ड आधारला लिंक ते फास्टॅगच्या नियमांत बदल झाले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Rules Changes From New Financial Year 2024-25 : भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार (RBI) आर्थिक वर्ष 2023-24 हे 31 मार्चला संपले आहे. यानंतर नवे आर्थिक वर्ष 2024-25 एप्रिल महिन्यापासून सुरू झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षात काही आर्थिक बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या कमाईसह बचतीवर होणार आहे. याशिवाय काही बदल तुमच्या फायद्यासाठीच आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

EPFO च्या सदस्यांना मोठा फायदा होणार
कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) च्या सदस्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत 1 एप्रिलपासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार ईपीएफ खातेधारकाने आपली नोकरी बदलल्यास त्यासोबत आपल्या जुन्या पीएफ खात्यातील रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की, नोकरी बदलल्यानंतर तुम्ही जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे.

नॅशनल पेन्शन स्किम अकाउंट सिक्युरिटी
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टिमला (NPS) अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आधार बेस्ड टू स्टेप ऑथेंटिफिकेशन सिस्टिम सादर केली आहे. ही सिस्टिम सर्व पासवर्डवर आधारित NPS युजर्ससाठी असणार असून ती 1 एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे.

फास्टॅग केवायसी अपडेट गरजेचे
तुम्ही 31 मार्च 2024 च्या आधी फास्टॅग केवायसी अपडेट केले नसल्यास 1 एप्रिल पासून फास्टॅग वापरण्यास समस्या येऊ शकते. खरंतर, NHAI ने फास्टॅग केवायसी अनिवार्य केले आहे. यासाठी युजर्सला फास्टॅग केवायसी अपडेट करावे लागणार आहे.

पॅन-आधार कार्ड लिंक दंड
केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा कालावधी वाढवली होती. हा कालावधी 31 मार्चपर्यंत होता. अशातच 31 मार्चआधी पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसल्यास तुमचे पॅन कार्ड रद्द होणार आहे. पॅन कार्ड रद्द झाल्यानंतर त्याचा वापर केल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. अशातच 1 एप्रिलनंतर पॅन कार्ड पुन्हा सुरू करायचे असल्यास तुम्हाला एक हजार रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.

रेल्वेचे जनरल तिकीट खरेदी करणे झाले सोपे
भारतीय रेल्वेने 1 एप्रिल पासून जनरल तिकीट खरेदी करण्यासंदर्भात मोठे बदल केले आहेत. रेल्वेने जनरल तिकीटासाठी रेल्वे स्थानकातील खिडकीवर होणारी गर्दी पाहता आणि नागरिकांचा अधिक वेळ फुकट जाऊ नये म्हणून पेमेंट सिस्टिमला क्यूआर कोडसोबत (QR Code) लिंक केले आहे. नव्या नियमानुसार, भारतीय रेल्वेने जनरल तिकीटाच्या पेमेंटलाही डिजिटल करत क्यूआर कोडला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रवासांना युपीआयच्या माध्यमातून जनरल तिकीट काढता येणार आहे.

आणखी वाचा : 

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

पासपोर्ट मिळवणारा राजस्थानचा पहिला ट्रान्सजेंडर कोण? त्याने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत केले काम

तुम्हाला दूरसंचार मंत्रालयाकडून कॉल येत आहेत का? या कॉलची तक्रार कशी कराल?