तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट

| Published : Apr 02 2024, 09:19 AM IST / Updated: Apr 02 2024, 09:21 AM IST

2000 notes

सार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपायंच्या नोटांसंदर्भात एक मोठे अपडेट दिले आहे. 19 मे, 2023 पर्यंत जेवढ्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या त्यापैकी 97.69 टक्के परत आल्या आहेत.

RBI 2000 Rs Note Update : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दोन हजार रुपयांच्या नोटांबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. आरबीआयने म्हटलेय की, 19 मे, 2023 पर्यंत जेवढ्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या त्याच्या 97.69 टक्के परत आल्या आहेत. याशिवाय आजही नागरिकांकडे 8202 कोटी रुपयांचे मूल्य असणाऱ्या दोन हजारांच्या नोटा आहेत. दरम्यान, 19 मे 2023 रोजी आरबीआयने घोषणा केली होती दोन हजारांच्या नोटांची छपाई केली जाणार नाही.

आरबीआयच्या कार्यालयांमध्ये दोन हजारांच्या नोटा बदलता येणार
आरबीआयनुसार, नोटा परत करण्याच्या घोषणेवेळी दोन हजार रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 19 मे, 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपये होते. 29 मार्च, 2024 रोजी मूल्य कमी होत 8202 कोटी रुपये झाले आहे. खरंतर, दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत बदलणे किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. यानंतर मर्यादा वाढवत 7 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान, आरबीआयच्या कार्यालयात दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 2 एप्रिल, 2024 पासून पुन्हा सुरू होणार आहे.

कुठे दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार?
देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस अथवा आरबीआयच्या कार्यालयात इंडिया पोस्टच्या माध्यमातून दोन हजारांच्या नोटा पाठवता येणार आहे. याचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. बँक नोट जमा अथवा बदलण्यासाठी तुम्ही आरबीआयची 19 कार्यालये उपलब्ध करून दिली आहेत. ही कार्यालये अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतरपुरम येथे आहेत.

दरम्यान, आरबीआयने नुकतीच घोषणा केली होती दोन हजारांच्या नोटा बदलण्यास किंवा खात्यात जमा करण्यासाठी 1 एप्रिल पासून सुविधा उपलब्ध होणार नाही. कारण आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवसाचे काही काम करणे शिल्लक होते. खरंतर, आरबीआयच्या शाखांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा एक्सजेंच करणे 7 ऑक्टोंबर, 2023 रोजी बंद केले होते. यानंतर नागरिकांना 8 ऑक्टोंबर, 2023 पासून आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये नोट बदलणे किंवा त्यांच्या बँक खात्यात डिपॉझिट करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.

आणखी वाचा :

Rules Change from 1st April : पॅन कार्ड आधारला लिंक ते फास्टॅगच्या नियमात बदल, आजच करा हे काम

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

'निवडणूक रोख्यांचा विरोध करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल